मुंबई

साठ गुंतवणूकदारांना चार कोटींचा गंडा

CD

साठ गुंतवणूकदारांना
चार कोटींचा गंडा
कदम कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक करून दरमहा पाच ते १४ टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत महामुंबईतील सुमारे ६० जणांची चार कोटी रुपयांना फसवणूक करणाऱ्या कदम कुटुंबाविरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा नोंदवला. विलास कदम, पत्नी विशाखा, मुलगा विपुल, मुलगी मानसी अशी आरोपींची नावे आहेत. मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर येथील अमोल शिंदेच्या तक्रारीवरून ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मानखुर्द येथीलच कदम कुटुंबीय गुंतवणुकीवर चांगला परतावा देतात, हे ऐकून अमोलने २०२२मध्ये त्यांची भेट घेतली. कदम यांनी सांगितलेल्या योजनेवर विश्वास ठेवत अमोलने तीन लाख रुपये गुंतवले. ठरल्याप्रमाणे परतावा मिळू लागल्याने टप्प्यटप्प्याने त्याने ३७ लाख रुपये गुंतवले; मात्र २०२३ पासून कदम कुटुंबाने परतावा देणे बंद केले. विचारणा केल्यावर आरोपींनी टाळाटाळ केली. अचानक हे कदम कुटुंब मानखुर्द येथील गाशा गुंडाळून गायब झाले. त्यानंतर फसवणूक झालेल्या अन्य ५९ गुंतवणूकदारांची माहिती मिळवून अमोलने ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT