मुंबई

काॅँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते भिडले

CD

काॅँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते भिडले

वाद चिघळला; साटम यांच्या कार्यालयावर माेर्चा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईत भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद शनिवारी (ता. २२) रस्त्यावर उतरला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप आमदार अमित साटम यांच्या अंधेरी येथील कार्यालयावर मोर्चा आणल्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर राडा झाला. पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या वेळी पाेलिसांनी कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले. यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
काही दिवसांपासून काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यातील वाद चिघळला आहे. लोढा यांनी अस्लम शेख यांच्यावर रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरीला पाठिंबा देण्याचा आरोप केला हाेता. त्यानंतर लाेढा यांनी धमकी दिल्याचा आराेप करून पोलिसांत तक्रारही केली. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी शेख यांच्यावर कठोर विधान करून ‘मालवणी पॅटर्न’ उखडून टाकू, अशी टीका केली होती. या विधानाचा निषेध करण्यासाठी आज युवक काँग्रेसचे कार्यकर्ते साटम यांच्या कार्यालयाबाहेर जमले. त्यांनी घोषणाबाजी करून साटम यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या वेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने तेथे धावून आणि दोन्ही गट समोरासमोर आल्याने वातावरण चांगलेच तापले.
----
पाेलिसांचा हस्तक्षेप
दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत जोरदार बाचाबाची झाली. काहीवेळ परिस्थिती तणावपूर्ण राहिल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना मागे हटवले आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन अस्लम शेख यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
---
अस्लम शेख हे मालवणीतील गोरगरिबांचा आवाज आहेत आणि त्यांच्यावर पोकळ आरोप करणे थांबवावे.
- वर्षा गायकवाड, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT