केईएम मार्डकडून एचपीव्ही लसीकरण मोहीम
सहा शिबिरांत सुमारे २५० लाभार्थ्यांना लसींचे डोस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : केईएम महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स संघटनेने राज्यातील पहिल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेची मालिका पूर्ण केल्याची घोषणा केली. ८ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय महिलादिनी मोहिमेला सुरुवात झाली होती. या काळात एकूण सहा लसीकरण शिबिरे कम्युनिटी मेडिसिन विभाग व स्त्रीरोग विभागाच्या सहकार्याने घेण्यात आली. या शिबिरांत गार्डासिल-४ आणि गार्डासिल-९ या लसींंचा अनुदानित दरात पुरवठा करून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्यात आली.
एचपीव्ही हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा, जननेंद्रियांवर वार्टसचा आणि इतर लैंगिकरीत्या संक्रमित आजारांचा एक प्रमुख कारणीभूत घटक आहे. आतापर्यंत ही लस महिलांना दिली जायची. आता नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार पुरुषांनाही ही लस घेता येऊ शकते. पुरुषांच्या अंतर्गत अवयवांच्या त्वचेला होणारा विषाणू आजार या लसीने होणार नाही.
मोहिमेत वैद्यकीय विद्यार्थी, इंटर्न, रेसिडेंट डॉक्टर्स, प्राध्यापकवर्ग व नर्सेस यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे पुरुष लाभार्थ्यांनाही लसीकरण करण्यात आले. यातून सर्व लिंगांसाठी एचपीव्ही प्रतिबंधाचे महत्त्व अधोरेखित झाले. संपूर्ण मोहिमेदरम्यान सर्व सुरक्षा नियम व वैद्यकीय दक्षता काटेकोरपणे पाळण्यात आली. सहा शिबिरांत सुमारे २५० लाभार्थ्यांनी लसीचे सर्व तीन डोस पूर्ण केले असून, त्यांना लसीकरण पूर्णत: प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. केईएम एमएआरडीने अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आणि कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
ही कामगिरी महाराष्ट्रातील प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रमांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, केईएम मार्डने राज्यातील सर्व स्थानिक मार्डध्ये अशाच एचपीव्ही लसीकरण मोहिमा राबवण्याचे आवाहन केले आहे.
- डॉ. अमर आगमे, अध्यक्ष, केईएम, मार्ड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.