नवीन फौजदारी कायद्यावरील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नवीन फौजदारी कायदे संहिता, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम, याबाबत जनजागृती करण्यासाठी आझाद मैदानात भरवण्यात आलेल्या पाचदिवसीय प्रदर्शनाला सामाजिक संस्था तसेच सर्वसामान्य लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग यांच्या आवाहनानुसार आयोजित या प्रदर्शनात नागरिकांना नव्या कायद्यांची रचना, प्रक्रिया आणि बदल समजावून सांगण्यात आले. प्रदर्शनात पोलिस नियंत्रण कक्ष, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, न्याय वैद्यक विभाग, अभियोग संचालनालय, नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय तसेच मध्यवर्ती कारागृह यांच्या माहितीपूर्ण स्टॉल्सचा समावेश होता. रुग्णमित्र विनोद साडविलकर, प्रफुल्ल नवार आणि किरण साळवे यांनी भेट दिली.
प्रदर्शनात नाट्यरूपांतर आणि प्रात्यक्षिकांद्वारे तपास, न्यायालयीन प्रक्रिया, सायबर गुन्हे, पुरावे संकलन अशा विविध घटकांची माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक नाझिया सय्यद, सहाय्यक संचालक ऋ. जा. जोशी, सायबरतज्ज्ञ मनीष कवठे, मानसशास्त्रतज्ज्ञ गणेश गोरडे, जी. टी. हॉस्पिटलचे डॉक्टर एंजल वासुदेवा आणि डॉ. जगदीश चोथे, तसेच कारागृह विभागातील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. गृह विभागाच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भेटीनंतर रुग्णमित्रांनी डिजिटल अभिप्राय नोंदवून या जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.