भाडेकरू रहिवाशांना मिळणार २५ हजार रुपये भाडे
कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प; प्रकल्प आराखड्यात म्हाडाकडून प्रस्तावित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासाठी विकसकाने सादर केलेल्या निविदेला राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीने मंजुरी दिल्याने हा प्रकल्प होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे पुनर्विकासादरम्यान येथील भाडेकरू रहिवाशांना आपली घरे रिकामी करावी लागणार आहेत. त्यासाठी त्यांना दरमहा २५ हजार रुपये भाडे देण्याबाबत म्हाडाने प्रकल्प आराखड्यात प्रस्तावित केले आहे. त्यामुळे या भाड्याबाबत रहिवासी काय भूमिका घेणार, किती भाड्याची मागणी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कामाठीपुरा हा सुमारे ३४ एकर जागेवर वसला असून, तेथे ९४३ जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. त्यामध्ये सुमारे आठ हजार भाडेकरू आहेत. पुनर्विकासासाठी सदरच्या इमारती टप्प्याटप्प्याने रिकाम्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे संबंधित रहिवाशांना पर्यायी वास्तव्याची व्यवस्था करता यावे म्हणून प्रकल्प अहवाल तयार करताना म्हाडाने किमान २५ हजार रुपये भाडे देण्याबाबतची अट घातली होती. दरम्यान, म्हाडाने प्रस्तावात नमूद केल्याहून अधिक गृहसाठा म्हाडाला देण्याबाबत निविदा भरल्या होत्या. त्यामुळे आता रहिवासी २५ हजार रुपये भाडे मान्य करणार की नाही, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
२० हजार रुपये भाडे
म्हाडाच्या नियमानुसार सध्या उपकरप्राप्त इमारत धोकादायक झाल्याने रिकामी केल्यास संबंधित रहिवाशाला म्हाडाकडून संक्रमण सदनिका किंवा २० हजार रुपये भाडे दिले जाते, मात्र कामाठीपुरा हा विशेष पुनर्विकास प्रकल्प असल्याने म्हाडाने २५ हजार रुपये भाडे प्रस्तावित केले आहे. दरम्यान, रहिवासी आणि विकसक भाड्याबाबत निर्णय घेऊ शकतात, असे म्हाडामुळे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.