मुंबई

तीन वर्षातील आगी, स्फोटांची नव्याने तपासणी

CD

तीन वर्षांतील आगी, स्फोटांची नव्याने तपासणी
अपघात की घातपात?; स्पष्ट करण्याचे पोलिसांना निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मागील तीन वर्षांत राज्यातील निवासी, व्यावसायिक संकुले, औद्योगिक वसाहतींमध्ये लागलेल्या आगी, सिलिंडर किंवा अन्य उपकरणांचे स्फोट, वायुगळती इत्यादी घटनांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश महासंचालक कार्यालयाने सर्व पोलिस आयुक्तालये, जिल्हा अधीक्षक कार्यालयांना दिले आहेत. दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांतील अशा घटना अपघात होता की घातपात, याबाबत पुन्हा तपास केला जाणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
नुकताच १० नोव्हेंबरला दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला होता. या पार्श्वभूमीवर मागील १७ वर्षांपासून शांत असलेल्या महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर आदी प्रमुख शहरांत अशा हल्ल्याची पुनरावृत्ती घडू नये, या उद्देशाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असल्याचे राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
निवासी, व्यावसायिक संकुले, औद्योगिक वसाहतींमध्ये लागलेल्या आगींपैकी, ज्यात मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी, वित्तहानी झाली ती प्रकरणे पुन्हा तपासावीत. निष्काळजीपणाने आग लागली की हेतुपुरस्सर लावण्यात आली याची पुन्हा एकदा खातरजमा करावी, असे आदेश मुख्यालयातून सर्व पोलिस आयुक्तालये, अधीक्षक कार्यालयांना देण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
----
काश्मिरी विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी तपासणार
राज्यातील प्रमुख शहरांतील शासकीय, खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांची पडताळणी करून त्यांची सूची नव्याने तयार केली जाईल. प्रत्येकाची पार्श्वभूमी तपासून संबंधित शिक्षण संस्थांशी समन्वय राखण्याचेही आदेशात नमूद केले आहे.
----
बांधकाम मजुरांचीही झाडाझडती
शहरात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांची धरपकड तीव्र केली जाईल. त्यासाठी बांधकाम मजुरांची पडताळणी केली जाईल. शिवाय तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्था, व्यक्तींची गोपनीय माहिती मिळवून त्यांच्यावर करडी नजर ठेवण्याची सूचनाही मुख्यालयाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Government Job Fraud : एकाच वेळी दोन-दोन सरकारी नोकऱ्या करत होता पठ्ठ्या, ३३ वर्षे घेतला पगार; कोर्टाने सुनावली ७ वर्षांची शिक्षा

हे, भाऊ शोभतात! बांगलादेशचे दोन्ही फलंदाज एका दिशेला, पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केलं पाहा Video Viral

Government Stray Dog Policy : शिकवायचं की कुत्री मोजायची? आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर? सरकारचा अजब फतवा, काय आहे नेमका प्लॅन?

Latest Marathi News Live Update : एलपीजी गॅस सिलेंडर टंचाईची झळ आता गडचिरोली शहराला

स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाल्या...'गेली दोन वर्ष मी...'

SCROLL FOR NEXT