सिद्धांत कपूरकडे पाच तास चौकशी
ड्रग्ज पार्ट्या प्रकरण
मुंबई, ता. २५ : देशविदेशात घडलेल्या ड्रग्स पार्ट्यांप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने मंगळवारी (ता. २५) अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत याच्याकडे तब्बल पाच तास चौकशी केली. त्याचा जबाब नोंदवण्यात आला. सिद्धांतला चौकशीसाठी पुन्हा बोलावले जाईल, असे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दुपारी एकच्या सुमारास सिद्धांत आपल्या वकिलासह पथकाच्या घाटकोपर कक्ष कार्यालयात हजर झाला. पोलिस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांच्या समक्ष पथकातील अधिकाऱ्यांनी सिद्धांतकडे चौकशी केली; मात्र सिद्धांत प्रत्येक प्रश्नाला वकिलाच्या सूचनेनुसार उत्तरे देत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी समाजमाध्यम प्रभावक ओऱ्हान अवतरामानी ऊर्फ ओरी याची चौकशी होण्याची शक्यता आहे. दुबईहून प्रत्यार्पित करण्यात आलेल्या अमली पदार्थ तस्कर टोळीतील प्रमुख आरोपी मोहम्मद सलीम शेख याने ओरीसह बॉलीवूड कलाकार, राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या देशविदेशातील पार्ट्यांमध्ये कोकेन, चरस इत्यादी अमली पदार्थ पुरवले, असा आरोप अमली पदार्थविरोधी पथकाने ठेवला आहे. त्यात सिद्धांत, ओरी यांच्यासह अभिनेत्री श्रद्धा, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलिशाह पारकर, नोरा फतेही, अब्बास मस्तान आणि माजी आमदार झीशान सिद्दीकी आदींच्या नावांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.