पाच वर्षांच्या अपहृत बालिकेची सुटका
मामा-मामीने अपहरण करून विकले; पाच जणांना अटक
मुंबई, ता. २६ ः सांताक्रूझ येथून पाच वर्षांच्या भाचीचे अपहरण करून विकणाऱ्या मामा, त्याची पत्नी आणि अन्य तीन साथीदारांना वाकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मामा-मामीने या बालिकेला ९० हजार रुपयांमध्ये पनवेल येथील टोळीला विकले. या टोळीने बालिकेची पावणेदोन लाख रुपयांत विक्री केली होती. आरोपींना अटक करून वाकोला पोलिसांनी या बालिकेची सुखरूप सुटका केली.
सांताक्रूझ परिसरातून ही बालिका २२ नोव्हेंबरला बेपत्ता झाली. पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास, शोधमोहीम आरंभली. उपआयुक्त मनीष कलवानिया यांनी सहाय्यक आयुक्त ज्योत्स्ना रसम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांची नियुक्ती केली. सीसीटीव्ही चित्रण, परिसरातील नागरिकांकडे चौकशी केल्यावर एका संशयित रिक्षाचालकाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. अपहरणाच्या दिवशी ही रिक्षा सांताक्रूझहून पनवेलला गेली आणि तेथून परत आल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी रिक्षाचालक लतिफ शेख याला ताब्यात घेत चौकशी केली तेव्हा त्याने बालिकेला तिच्याच मामा-मामीने पनवेल येथे सोडल्याची माहिती दिली. याआधारे पोलिसांनी लॉरेन्स निकलेस फर्नांडिस आणि मामी मंगल यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी लागलीच गुन्हा कबूल केला. त्यांनी भाची करण सणस या परिचित तरुणास ९० हजार रुपयांना विकल्याची माहिती दिली.
...
एका आरोपीचा शोध सुरू
पोलिसांनी करणला पनवेल तालुक्यातून ताब्यात घेतले. त्याने या बालिकेस वृंदा चव्हाण, अंजली कोरगावकर या महिलांना दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी वृंदाला ताब्यात घेत बालिकेची सुटका केली. ताब्यात घेतलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, अंजलीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.