मुंबई

‘शक्ती’ वाघाचा न्यूमोनियाने मृत्यू

CD

‘शक्ती’ वाघाचा न्यूमोनियाने मृत्यू
भायखळा प्राणिसंग्रहालयातील घटना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील नऊ वर्षांचा रॉयल बंगाल वाघ ‘शक्ती’ हा १७ नोव्हेंबरला दुपारी मृत्युमुखी पडला. प्राथमिक शवविच्छेदनानुसार शक्तीचा मृत्यू न्यूमोनिया झाल्यानंतर श्वसन प्रणाली निकामी झाल्याने झाला. श्वसननलिकेत हाड अडकल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती पसरवली जात असून ती निराधार आहे, असे प्राणिसंग्रहालयाने स्पष्ट केले आहे.
शक्तीने १५ नोव्हेंबरपासून अन्न घेणे बंद केले होते. १६ तारखेला थोडेसे मांस खाल्ल्यानंतर त्याला उलटीचा उमाळा आला. त्याची प्रकृती पाहता त्याला पशुवैद्यकीय देखरेखीखाली ठेवून पाण्यातून औषध देण्यात आले. १७ नोव्हेंबरला आरोग्य तपासणीसाठी पिंजऱ्यात घेत असताना त्याला अचानक अपस्माराचे झटके आले आणि दुपारी १२.१५ वाजता त्याचा मृत्यू झाला. याआधी शक्तीमध्ये कोणतेही गंभीर आजाराचे लक्षण दिसले नव्हते, असेही प्रशासनाने सांगितले. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी त्याच दिवशी दुपारी शवविच्छेदन केले. अहवालात ‘पायोग्रॅन्युलोमॅटस न्यूमोनिया’ झाल्याने श्वसन क्रिया बंद पडल्याचे नमूद आहे. सविस्तर अहवाल प्रतीक्षेत असून, अवयवांचे नमुने नागपूर येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राकडे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
...
परंपरेनुसार अंत्यसंस्कार
शक्तीच्या मृत्यूची माहिती १८ नोव्हेंबरला केंद्रीय आणि राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला पाठवण्यात आली. प्राणिसंग्रहालयातील परंपरेनुसार शक्तीचे अंत्यसंस्कार करण्यात आले असून, सध्या ‘जय’ (नर) आणि ‘करिश्मा’ (मादी) हे दोन वाघ पर्यटकांसाठी प्रदर्शनात उपलब्ध आहेत, असे उद्यान प्रशासनाने कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT