मुंबई

विद्यार्थ्यांसाठी एसटीची हेल्पलाईन

CD

विद्यार्थ्यांसाठी एसटीची हेल्पलाइन
आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्यातील शालेय मुला-मुलींसाठी एसटी महामंडळाने नवीन हेल्पलाइन क्रमांक १८००२२१२५१ सुरू केला आहे. हा क्रमांक विद्यार्थ्यांना मदत मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अनेकदा एसटी बस उशिरा सुटतात, काही वेळा अचानक रद्द होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे तास बुडतात, परीक्षा चुकतात आणि त्यांना त्रास सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकांवर असणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले आहेत, की यापुढे अशा शालेय नुकसानीला संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक जबाबदार असतील. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान मुख्य बसस्थानकांवर आणि विद्यार्थ्यांची जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी संबंधित पर्यवेक्षकांनी गणवेशात उपस्थित राहून बसचे नियोजन पाहावे. शेवटचा विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचेपर्यंत तेथून हलू नये. जर कोणत्याही बसच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, तर विद्यार्थ्यी, त्यांचे पालक किंवा त्यांची शाळा-महाविद्यालये याबद्दल लेखी तक्रार करू शकतात. अशा वेळी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला बस उशिरा येणे, रद्द होणे किंवा तांत्रिक बिघाडामुळे घरी जाण्यात अडचण झाल्यास त्यांनी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करून मदत घ्यावी. तसेच सर्व शाळा-महाविद्यालयांना संबंधित विभाग नियंत्रकांचे फोन नंबर देण्यात येणार आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना किंवा प्राचार्यांना तातडीची मदत मिळेल. या नवीन नियमांमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोपा होईल.
...
बस वेळेवर न आल्याने अथवा अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोहोचण्यास खूप उशीर होतो. शालेय नुकसानीची जबाबदारी निश्चित केल्याने त्याचा फायदा होईल.
- मनीषा माने, पालक
...
एसटी महामंडळाने हेल्पलाइन सुरू केली ही चांगली बाब आहे. त्याचा विद्यार्थ्यांसोबत पालकांनादेखील फायदा होईल.
- जितेंद्र कांबळे, पालक
...
शालेय बसफेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार संबंधित विद्यार्थी अथवा विद्यार्थिनींनी तसेच संबंधित शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी केल्यास जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकाऱ्यांना निलंबित अथवा सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : धुळे ग्रामस्थांच्या मदतीने 5 दरोडेखोर गजाआड, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Kumbh Mela : सिंहस्थात भाविकांची पायपीट थांबणार! गोदाघाटाजवळच उभारली जाणार अंतर्गत वाहनतळे

SCROLL FOR NEXT