सुरक्षा, निगराणीसाठी पोलिस दलात ड्रोन कक्ष
धोरणाची रूपरेषा तयार
मुंबई, ता. २६ ः दहशतवादविरोधी लढ्यात सुरक्षा आणि निगराणीसाठी ड्रोनच्या वापराबाबतचे धोरण राज्य पोलिस दलाकडून तयार करण्यात येत आहे. या धोरणानुसार मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये भविष्यात ड्रोन कक्ष स्थापन केले जाणार आहेत. शासनाच्या मान्यतेनंतर या धोरणाची अंमलबजावणी होईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने बुधवारी (ता. २६) स्पष्ट केले.
२६/११ हल्ल्यानंतर शासनाने प्रतिहल्ला, सुरक्षा, प्रतिबंधाच्या दृष्टीने प्रत्येक पातळीवर पोलिस दल बळकट करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात दहशतवादी हल्ल्यासाठी अनोखी किंवा प्रचलित नसलेली पद्धत वापरली जाईल, असा अंदाज गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रकारचा हल्ला परतावून लावण्याच्या दृष्टिकोनातून पोलिस दल सक्षम असावे, हरप्रकारचे अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असावे, पोलिस अधिकारी, अंमलदार या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित असावा, यासाठी पोलिस दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. ड्रोन धोरणही त्याचाच एक भाग आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांपासून गर्दीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनचा वापर सुरू झाला आहे. या धोरणात मुंबईसारख्या महानगरांमध्ये ड्रोन कक्षाची शिफारस असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या कक्षातील अधिकारी, कर्मचारी दहशतवादी हल्ला, युद्धसदृश पद्धती, मोठा गुन्हा, गर्दी खेचणारे सण, उत्सव किंवा अन्य निमित्तामध्ये ड्रोनचा वापर कसा करावा, यासाठी प्रशिक्षित असेल, असे समजते. राज्य पोलिसांसाठी हे धोरण केंद्रीय यंत्रणांसोबत समन्वय ठेवून फोर्स वनद्वारे तयार केले जात आहे. या धोरणाची रूपरेषा तयार असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.