मुंबई

केक कापताच पेट्रोल ओतून पेटवले

CD

केक कापताच पेट्रोल ओतून पेटवले
कुर्ल्यातील घटना; पाच मित्रांना अटक

मुंबई, ता. २६ : वाढदिवस साजरा करण्याचा उन्माद इतका वाढला की मित्रांनी एका तरुणावर चक्क पेट्रोल ओतून पेटवून दिले. हा धक्कादायक प्रकार कुर्ला पश्चिमेकडील कोहिनूर सोसायटीत घडला. या घटनेत वाढदिवस असलेला तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी पाच तरुणांना सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न या कलमानुसार गुन्हा नोंदवून अटक केली.
ही घटना घडण्याआधी मित्रांनी या तरुणाला घराबाहेर बोलावून केक कापून वाढदिवस साजरा केला. थट्टामस्करी सुरू असताना अचानक त्याच्या अंगावर अंडी फोडली, दगड भिरकावले आणि पुढे पेट्रोल शिंपडून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कृतीमागे निव्वळ थट्टामस्करी होती की हा सुनियोजित कटाचा भाग होता, याबाबत पोलिस अटक आरोपींकडे चौकशी करीत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी तरुणाचे नाव अब्दुल रहमान खान (वय २१) असे असून, तो खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. मंगळवारी त्याचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अयाज मलिक, अशरफ मलिक, कासिम चौधरी, हुजैफा खान, शरीफ शेख या पाच मित्रांनी अब्दुलला घराबाहेर बोलावले. मित्रांनी केक आणल्याचे पाहून अब्दुल खूश झाला; मात्र केक कापल्यावर पुढील अनपेक्षित घटनाक्रम घडला, असे त्याने आपल्या जबाबात सांगितले. हा सर्व घटनाक्रम इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिस त्याआधारे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

Latest Marathi News Live Update : नवले पुल परिसरात पुन्हा अपघात, भर रस्त्यात कार उलटली

Cosmetic Treatment Safety: लेसर, बोटॉक्स, हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी सावधान! तज्ज्ञांकडूनच उपचार घेण्याचा इशारा

Kolhapur Bangalore airport connectivity : देशातील सर्वात मोठा आयटी पार्क असलेल्या शहरासोबत कोल्हापूर विमानसेवा होणार सुरू

SCROLL FOR NEXT