मुंबई

सायन सर्कल येथील प्रवास सुरक्षित होणार

CD

सायन सर्कल येथील प्रवास सुरक्षित होणार
वाहतूक पोलिस, पालिका, स्वयंसेवी संस्थेच्या विविध उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः मुंबईतील २० ब्लॅकस्पॉट (अपघातप्रवण क्षेत्र) पैकी एक असलेल्या सायन सर्कल येथे २०२१ ते २०२३ या कालावधीत सहा लोकांचा मृत्यू झाला होता. आता वाहतूक पोलिस, पालिका, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सायन सर्कल येथील प्रवास सुरक्षित होणार आहे.
सायन सर्कल जंक्शन तीन मुख्य रस्त्यांना जोडले आहे. मुंबईतील धोकादायक अपघात होणाऱ्या २० ठिकाणांपैकी एक आहे. येथे तीन वर्षांत सहा मृत्यू आणि १९ जण गंभीर जखमी झाले आहे. सायन सर्कलजवळ परिसरात चार शाळा आणि एक महाविद्यालय असल्यामुळे अनेक मुले, महिला आणि नागरिक यांना अडचणीचा सामना करावा लागत होता.
मुंबई महापालिकेने डब्‍ल्यूआरआय इंडियाकडे या भागाचे परीक्षण करण्याची मागणी केली होती. त्यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले, की रस्ता फार मोठा असल्याने वाहने जास्त वेगाने चालतात. रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना सुरक्षितपणे थांबण्यास जागा नसून योग्य चिन्हांचाही अभाव आहे. यावर उपाय म्हणून डब्ल्यूआरआय इंडियाने काही बदल सुचवले आहेत. त्यामध्ये सर्कलभोवती रस्त्याची रुंदी १०.५ मीटर ठेवावी, चारही बाजूला मध्यक वाढवण्याचा आणि चार ठिकाणी वळण्याचा मार्ग छोटा करण्याचा समावेश आहे. याशिवाय ‘नो यू-टर्न’ आणि ‘रोटरी’ यांसाठी सतर्कता दाखवणारी चिन्हे लावली. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मध्यभागी थांबण्याची जागा तयार केली. रस्ता ओलांडण्यासाठी स्पष्ट चिन्हांकित रस्त्याचे ठिकाण २०४ चौ. मीटरमध्ये तयार केले. ही सुधारणा पालिका आणि मुंबई वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने २०२५ मध्ये अमलात आणली जात आहे. जून २०२५ पर्यंत तीन ठिकाणी मध्‍यक वाढवण्याचे आणि कर्ब रंगवण्याचे काम झाले असून सुमारे १७० चौ. मीटर सार्वजनिक जागा मिळाली आहे. पादचाऱ्यांसाठी तसेच वाहनांसाठी योग्य चिन्हे बसवण्यात आली आहेत. या बदलांमुळे सायन सर्कल आता अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित बनणार आहे.

अपघात रोखण्यास मदत
सायन सर्कल येथे होणाऱ्या अपघातांबाबत डब्ल्यूआरआय इंडियाने पाहणी केली. त्यांनी काही उपाययोजना केल्या आहेत, त्यामुळे अपघात रोखण्यास मदत होईल, असे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT