जाहिरातींसाठी नवे नियम
पालिकेची मागर्दर्शक तत्त्वे; मोठ्या आकारास नकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : महापालिका हद्दीतील जाहिरातींचे नियमन करण्याच्या अनुषंगाने महापालिकेकडून ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे-२०२५’ जाहीर करण्यात आली आहेत. आजपासून (ता. २७) ही मार्गदर्शक तत्त्वे महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. जाहिरातदार, जाहिरात संस्था तसेच संबंधित सर्व घटकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महापालिकेने यापूर्वी जाहीर केलेल्या ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे- २००८’मध्ये सुधारणा करीत २०२५मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही नवीन बाबींचा समावेश केला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ४० बाय ४० फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या जाहिरात फलकास परवानगी दिली जाणार नाही. पदपथ तसेच इमारतीच्या गच्चीवर जाहिरात प्रदर्शित करण्यास नव्याने परवानगी दिली जाणार नाही. डिजिटल जाहिरात फलकांची प्रकाशमानता ३:१ या गुणोत्तरापेक्षा अधिक ठेवता येणार नाही. तसेच लुकलुकणाऱ्या जाहिरात प्रदर्शित करण्यास परवानगी नसेल. मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, व्यापारी संकुल, वाणिज्यिक इमारती, पेट्रोलपंप येथे एलईडी जाहिरात प्रदर्शित करता येईल. तसेच बांधकाम सुरू असलेल्या व दुरुस्तीची कामे सुरू असलेल्या इमारतींच्या कुंपणावर तसेच इमारतीच्या बाह्यभागावर व्यावसायिक व अव्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करता येतील.
...
विविध आकार
मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रथमच एकेरी व पाठपोट फलकांसोबतच ‘व्ही’ व ‘एल’ आकार तसेच त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी स्वरूपाच्या जाहिरात फलकांना यापुढे परवानगी देण्यात येईल. याकरिता वाहतूक पोलिसांची ‘ना हरकत’ लागेल.
...
संकेतस्थळावर उपलब्ध
महापालिकेच्या जाहिरात परवाना खात्यामार्फत जाहिरातींना परवानगी देणे तसेच अनधिकृत जाहिरातींविरोधात कारवाई करण्याची कार्यवाही केली जाते. महापालिका अधिनियम १८८८च्या कलम ३२८/३२८ अ अंतर्गत महापालिकेच्या हद्दीतील जाहिरातींचे नियमन केले जाते. या पार्श्वभूमीवर माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीने सुचविलेल्या शिफारशी तसेच नागरिकांच्या हरकती व सूचना विचारात घेऊन ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे-२०२५’ जाहीर करण्यात येत आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे सविस्तर स्वरूपात महापालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.