मुंबई

एसटीपी उभारणीला वेग द्या!

CD

एसटीपी उभारणीला वेग द्या!
अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : महानगरातील सात मलजल प्रक्रिया केंद्रांची (एसटीपी) उभारणी वेगाने पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिले आहेत. तीन शिफ्टमध्ये मनुष्यबळ वाढवून कामे अखंडित सुरू ठेवावीत आणि प्रकल्पांची गुणवत्ता कायम ठेवत सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेकडून वरळी, वांद्रे, मालाड, घाटकोपर, धारावी, भांडुप आणि वेसावे येथे एसटीपी उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. या केंद्रांद्वारे दररोज २,४६४ दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया होणार आहे. संबंधित विभागप्रमुख, अभियंते आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांच्या उपस्थितीत बांगर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रकल्पातील अडचणी आणि उपाययोजना यावर चर्चा झाली. घाटकोपर आणि वेसावे एसटीपी जुलै २०२६ पर्यंत, भांडुप ऑगस्ट २०२६ पर्यंत, तर वरळी, वांद्रे आणि धारावी केंद्रे जुलै २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहेत. मालाड केंद्राचा पूर्णत्व कालावधी जुलै २०२८ असा आहे. या केंद्रांमुळे फोर्ट, भायखळा, प्रभादेवी, दादर, वांद्रे, बीकेसी, अंधेरी, जुहू, विलेपार्ले, गोरेगाव, घाटकोपर, मुलुंड, चेंबूर, भांडुप यांसारख्या विस्तृत परिसराला थेट फायदा होणार आहे. या केंद्रांमध्ये प्राथमिक, दुय्यम आणि तृतीयस्तरीय प्रक्रिया केली जाणार असून, तृतीय प्रक्रियेनंतरचे पाणी विविध शहरी गरजांसाठी पुनर्वापर केले जाणार आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारेल आणि सागरी जीवनाला मोठा लाभ मिळेल, असे बांगर यांनी सांगितले.
...
धारावीत बहुमजली
खारक्षेत्र आणि मँग्रोव्ह क्षेत्रातील नियमांमुळे काही केंद्रांना उशीर झाला असला तरी आता सर्व केंद्रांवर एकूण ३,००० मनुष्यबळ कार्यरत असून, एका वर्षात ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. धारावी येथे जागेअभावी बहुमजली एसटीपी उभारले जात आहे, तर वांद्रे केंद्रात छतावरील बाग आणि व्ह्युविंग टॉवरसारखी वैशिष्ट्यपूर्ण संरचना उभारण्याचेही नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: पॅट कमिन्सच्या जागेवर इशान किशन होणार SRH चा कर्णधार? काय आहेत नवे अपडेट्स?

'सनई चौघडे'चा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला की नाही? नेटकऱ्यांना आठवली 'ही' जुनी मालिका, म्हणतात- जोडी भारीये पण...

Latest Marathi News Live Update : सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याने वाद, मंगळवेढ्यातील प्रकार चर्चेत

'Dhurandhar' चित्रपट पाहून अडचणीत सापडला वैभव सूर्यवंशी... म्हणाला, माझी फेव्हरिट मुव्ही... सोशल मीडियावर गदारोळ

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

SCROLL FOR NEXT