मुंबईतील हवेत सुधारणा
देवनारमध्ये प्रदूषणाचा स्तर भीषणच
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : शहरातील हवेची गुणवत्ता अनेक भागांत सुधारलेली असली तरी देवनारमध्ये मात्र प्रदूषणाचा स्तर भीषणच राहिला आहे. मुंबईतील ३० निरीक्षण केंद्रांपैकी २४ केंद्रांवर मिळालेल्या आकडेवारीनुसार बोरिवली, कुलाबा, माझगाव, सायन, वांद्रे-खेरवाडी, धारावी परिसरातील एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) ‘मध्यम’ किंवा त्यापेक्षा चांगला झाला आहे. देवनारचा एक्यूआय तब्बल २०६ वर स्थिरावल्याने हा परिसर आजही सर्वाधिक प्रदूषित ठरत आहे.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (१४१), सायन (१०१), वरळी (१०९), मालाड (१३९), बोरिवली (११७), कुलाबा (७३), पवई (८४) यांसह बहुतेक भागांनी कालच्या तुलनेत चांगले गुण मिळवले. काही ठिकाणी एक्यूआय १००च्याही खाली आल्याने रहिवाशांना थोडा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. देवनारमध्ये (२०६) हा स्तर ‘वाईट’ श्रेणी ओलांडून ‘अतिशय वाईट’ या श्रेणीच्या टोकाला पोहोचलेला मानला जातो. स्थानिकांच्या मते, कचरा प्रक्रिया केंद्र, जड वाहनांची रहदारी, धुरकट वातावरण आणि मोठ्या प्रमाणातील धूळकण यामुळे हा परिसर कायमच प्रदूषणाच्या कचाट्यात अडकलेला असतो. देवनारनंतर नेव्हीनगर-कुलाबा (१७१) आणि वांद्रे-खेरवाडी (१६१) ही ठिकाणेही ‘वाईट’ श्रेणीत येत असून, या भागांना तातडीने प्रदूषण नियंत्रणाच्या अधिक ठोस उपायांची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात. महापालिका आणि एमपीसीबीकडून संवेदकआधारित निरीक्षण, बांधकामस्थळी धूळ नियंत्रण, रस्ते धुलाई, ट्रॅफिक नियंत्रण यांसारख्या उपाययोजनांवर अधिक भर देण्याची शक्यता आहे. देवनारसारख्या हॉटस्पॉट भागांत तातडीचे धूळ-धूर नियंत्रण पथक तैनात करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
...
मुंबईतील एकूण चित्र
एक्यूआय सुधारलेले प्रमुख भाग : कुलाबा (७३), पवई (८४), सायन (१०१)
मध्यम श्रेणीतील भाग : बोरिवली, अंधेरी-चकाला, मालाड, विलेपार्ले
खराब गुणवत्ता असलेले भाग : देवनार (२०६), नेव्हीनगर (१७१), खेरवाडी (१६१)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.