मध्य, हार्बर मार्गांवर रविवारी ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता २८ : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.
...
मध्य रेल्वे
कुठे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहारदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर
कधी - सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.४८ ते १५.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या सेवा भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून १०.१९ ते दुपारी १५.५२पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
...
हार्बर मार्ग
कुठे - पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्ग वगळून) अप आणि डाउन हार्बर मार्गावर
कधी - सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
परिणाम - पनवेल येथून १०.३३ ते १५.४९ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ११.०२ ते १५.५३ पर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२०पर्यंत सुटणाऱ्या व पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.
तसेच ब्लॉक काळात पोर्ट मार्ग उपलब्ध असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.