मुंबई

मेहुल चोक्सीची मागणी फेटाळली

CD

मेहुल चोक्सीची मागणी फेटाळली

मुंबई, ता. २८ : फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची कारवाई रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीने केलेली मागणी विशेष न्यायालयाने शुक्रवारी (ता. २८) फेटाळली. एप्रिल महिन्यात बेल्जियममध्ये अटक झाल्यानंतर चोक्सीने विशेष न्यायालयात अर्ज केला होता.
चोक्सीला फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या तरतुदींनुसार फरारी घोषित करण्याची आणि त्याची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज ईडीने जुलै २०१८ मध्ये विशेष न्यायालयात केला होता. तथापि, ईडीच्या अर्जात प्रक्रियात्मक त्रुटी असल्याचा आरोप करणारा अर्ज आणि याचिका चोक्सीने अनुक्रमे विशेष न्यायालय आणि उच्च न्यायालयात केला होत्या. त्यामुळे ईडीच्या अर्जावरील सुनावणी प्रलंबित होती. दरम्यान, तपास यंत्रणांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक केली गेली.  त्यानंतर, चोक्सीने विशेष न्यायालयात अर्ज करून त्याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी सुरू केलेली कारवाई रद्द करण्याची मागणी केली होती. प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर भारतातील प्रलंबित प्रकरणांमध्ये आपल्याला बेल्जियममध्ये अटक केली. ही बाब लक्षात घेता आपल्याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी सुरू केलेली कारवाई रद्द केली पाहिजे, असा दावा चोक्सी याने अर्जात केला होता. तर फरारी आरोपी न्यायालयासमोर उपस्थित झाल्यावरच त्याच्याविरुद्धची फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची कारवाई रद्द केली जाऊ शकते; परंतु चोक्सी हा न्यायालयासमोर हजर झालेला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्धची कारवाई तरी रद्द करता येणार नाही, असा दावा ईडीने केला. तसेच चोक्सी याच्या अर्जात  कोणतेही तथ्य नसल्याचा दावा करून तो फेटाळण्याची मागणी केली. चोक्सी (६५) आणि त्याचा पुतण्या हिरे व्यापारी नीरव मोदी हे १३,००० कोटी रुपयांच्या पीएनबी बँक कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT