मुंबई

भारताचा सांस्कृतिक आत्मा एक आहे गजेंद्र सिंह शेखवात यांचे प्रतिपादन

CD

भारताचा सांस्कृतिक आत्मा एक आहे
गजेंद्र सिंह शेखवात यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : भारतात विविध भाषा बोलल्या जातात. लोकांचे राहणीमान वेगवेगळे आहे; परंतु भारताचा सांस्कृतिक आत्मा एक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र सिंह शेखवात यांनी केले.
२५वा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार प्रदान समारंभ शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विविध मान्यवरांना बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, अभिनेते मकरंद देशपांडे, गायक कुमार सानू आणि साईदिशा प्रतिष्ठानचे दत्तात्रय माने उपस्थित होते.
गजेंद्र सिंह शेखवात म्हणाले, की ओडिसामध्ये जन्मलेली मुलगी हैदराबादमध्ये राहते. तिला आज मुंबईत पुरस्कार मिळत आहे, हे भारताच्या विविधतेत एकतेचे प्रतीक आहे.
====
हा पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे त्यांनी ज्या वेळेस स्त्रीला रंगमंचावर येण्याची परिस्थिती नव्हती त्या वेळी स्त्रीरूप आणि लकबी रंगमंचावर उभ्या केल्या. संगीत आणि अभिनय एक केले. त्यांच्या नावाने पुरस्कार घेणे महत्त्वाचे नाही, तर बालगंधर्व समजून घेणे आवश्यक आहे.
- आशीष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री
==
कलाकाराला पुरस्काराने प्रोत्साहन मिळते. साईदिशा प्रतिष्ठानची २५ वर्षांपासून समाजसेवा सुरू आहे. आम्ही कलाकार समाजसेवेत आपले योगदान देतो. या सामाजिक संस्थेशी आता जोडले गेले आहोत. भविष्यात या संस्थेला समाजसेवेसाठी सहकार्य करू.
- कुमार सानू, गायक
==
नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार
गायन विभाग - गायक कुमार सानू, पीयूष पनवर
अभिनय विभाग - अभिनेता मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सई ताम्हणकर,
बालगंधर्व कलारत्न पुरस्कार - शरद गुजर
रायसिंग स्टार पुरस्कार - बरकत अरोरा
==
सेवारत्न पुरस्कार

सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे.
अजित कुंभार, संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी
सुचिता भिकाने, अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी चालक, महापारेषण
==
संतशिरोमणी पुरस्कार
कालीपुत्र कालीचरण महाराज, आध्यात्मिक गुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: फेब्रुवारीत गुंतवणूकदारांचा बदलला मूड! कोणत्या फंडांमध्ये वाढली गुंतवणूक? गोल्ड ETF गुंतवणुकीत मोठा बदल

मोठी बातमी : T20 World Cup विजेत्या भारतीय खेळाडूवर आयसीसीची दंडात्मक कारवाई! 'ती' चूक महागात पडली

भररस्त्यात प्रसिद्ध अभिनेत्रीला मारली कानशिलात, सोशल मीडियावर Viral Video

Thane News: मेट्रो प्रकल्पासाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड, प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

Latest Marathi News Live Update : व्यावसायिक गॅस टंचाई; हॉटेलचालकांना लाकडाच्या भट्टीवर स्वयंपाक करण्याची वेळ

SCROLL FOR NEXT