मुंबई

स्वच्छ वायूसाठी युवकांची सक्रियता

CD

स्वच्छ वायूसाठी युवकांची सक्रियता
मुंबई, ता. २९ : ‘स्वच्छ वायूसाठी युवकांची सक्रियता’ या उपक्रमांतर्गत चेंबूर येथील विवेकानंद शिक्षण संस्थेत पर्यावरण संरक्षणाविषयी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. पर्यावरण आणि वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी युवकांची भूमिका ठळकपणे अधोरेखित करणारा हा कार्यक्रम महापालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी ओला-सुका कचरा विभाजन, वायू प्रदूषण नियंत्रण, ग्रीन लिव्हिंग आणि जनजागृती यांसारख्या विषयांवर तयार केलेल्या प्रकल्प, पोस्टर आणि लघुपटांचे सादरीकरण केले. मान्यवरांनी या सादरीकरणांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या आणि त्यांचे कौतुक केले. उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यकारी अभियंता वर्षा आठल्ये म्हणाल्या, की वायू प्रदूषण हे मुंबईसमोरील गंभीर नागरी आव्हान आहे. एनसीएपीमुळे रस्ते स्वच्छता, धूळ नियंत्रण यंत्रणा आणि कचरा व्यवस्थापन सुधारणा यावर अधिक भर दिला जात आहे. लहान कृतींचा मोठा पर्यावरणीय परिणाम होऊ शकतो आणि तरुण यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. डॉ. अजित साळवी यांनी सांगितले, की महापालिकेने स्वच्छ वायू कार्यक्रमासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. युवकांचा सहभाग पुढील पिढीकरिता स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्यास हातभार लावणारा ठरेल.

....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT