मुंबई

‘पुस्‍तकॅफे’ला पसंती

CD

‘पुस्‍तकॅफे’ला पसंती
माटुंग्‍यात तरुणाई घेतेय खाण्यासोबत वाचनाचा गोडवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात पुस्तक वाचनासाठी शांत जागा मिळणे दुरापास्त आहे. अशा परिस्‍थितीत पुस्तक वाचण्यासोबतच खाण्याचीही व्यवस्‍था माटुंग्‍यातील ‘पुस्‍तकॅफे’ करतोय. येथील नितीन नाई या २४ वर्षीय तरुणाच्या संकल्‍पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
माटुंगा येथील रूपारेल महाविद्यालयाजवळ तरुणाने पुस्तक कॅफे सुरू केले आहे. या कॅफेमध्ये चार हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध असून येथील खाद्यपदार्थांचा दरदेखील खिशाला परवडणारा आहे. सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत हा कॅफे सुरू असतो.
नितीन नाई यांनी सांगितले, की महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडे पैसे कमी असतात. त्यामुळे कॅफेतील खाद्यपदार्थांचा दर परवडेल इतकाच ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आवडतील, असे पदार्थ आमच्याकडे मिळतात, असे त्‍यांनी सांगितले.
कॅफेची रचनादेखील विद्यार्थ्यांना आवडेल, अशी आहे. येथील भिंतींवर काही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. खाली आणि वर दोन्ही ठिकाणी पुस्तकांचे रॅक्स आहेत. विद्यार्थ्यांना सीटवर बसून खाता-खाता एखादे पुस्तक वाचता येईल, अशी व्यवस्था आहे. या कॅफेमध्ये अतिशय शांत वातावरण असल्‍याने महाविद्यालयीन विद्यार्थी, पुस्तकप्रेमींची चांगली पसंती मिळत आहे.

‘पुस्तकॅफे’ कल्पना खूप चांगली आहे. रूपारेल महाविद्यालय जवळ असल्‍याने विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी असते. खाद्यपदार्थही चांगले मिळत आहेत.
- सिआ शुक्ला,
विद्यार्थी, रूपारेल कॉलेज

विविध प्रकारची पुस्‍तके येथे वाचायला मिळतात. मला कादंबरी वाचायला आवडते. मोकळे वातावरण आणि चविष्ट खाद्यपदार्थ आणि पुस्‍तकांची सोबत असल्‍याने आणखी छान वाटते.
- ऋषीम जाधव,
विद्यार्थी, रूपारेल महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT