मुंबई

रॅपिडो बाईक टॅक्सीचा अपघात

CD

रॅपिडो बाइक टॅक्सीचा अपघात
प्रवासी महिलेचा मृत्यू; चालक गंभीर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने रॅपिडो बाइक टॅक्सीला धडक दिल्याने महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी पूर्व द्रुतगती मार्गावरील ऐरोली चौकात घडली. शुभांगी मगरे (वय ४९) असे मृत महिलेचे नाव आहे. चालक गणेश माधव (वय २१) गंभीर जखमी झाला. याप्रकरणी नवघर पोलिसांनी मिक्सर ट्रकचालक जवाहर यादव यास अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पूर्व येथील सनरूप टॉवरमध्ये राहणाऱ्या शुभांगी यांनी शनिवारी सकाळी रॅपिडो बाइक टॅक्सी आरक्षित केली. चालक गणेशच्या बाइक टॅक्सीवर बसून त्या माटुंग्याच्या दिशेने निघाल्या. पूर्व द्रुतगती महामार्गावर ऐरोली जंक्शनजवळ बाइक टॅक्सीला भरधाव सिमेंट मिक्सरने धडक दिली. या धडकेत शुभांगी आणि गणेश दोघेही दूरवर फेकले गेले. दोघांना फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र शुभांगी यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गणेशची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील मुळा नदीच्या पात्रात आढळला महिलेचा मृतदेह

Navi Mumbai: महाराष्ट्रात मोठी ड्रग्ज तस्करी, धागेदोरे पाकिस्तानातून पंजाबमार्गे, ४० आरोपींना अटक; नवी मुंबई पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT