मुंबई

मुंबई आणि मियामीतील डेको आर्टची शंभरी

CD

मुंबई आणि मियामीतील डेको आर्टची शंभरी
दोन्ही शहरांच्या ऐतिहासिक इमारतींमध्ये वास्तुरचनेमध्ये एकसमान स्थापत्यप्रभाव
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : ओव्हल मैदान आणि मरीन ड्राइव्ह परिसरातील आर्ट डेको शैलीतील वैशिष्ट्यपूर्ण इमारतींच्या वास्तुकलेला शंभर वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयात एका खास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आर्ट डेको इमारतींमध्ये मुंबईचा मियामीनंतर क्रमांक लागतो. या दोन्ही शहरांच्या इतिहासात, जीवनशैलीत त्याचसोबतच वास्तुरचनेतही एकसमान स्थापत्यप्रभाव या प्रदर्शनात दिसून आले. या प्रदर्शनीच्या माध्यमातून ऐतिहासिक आर्ट डेको वास्तुरचना शैलीला उजाळा मिळाला.
‘आर्ट डेको अलाइव्ह’ या महोत्सवाचे प्रदर्शन आर्ट डेको मुंबई ट्रस्टने मियामी डिझाइन प्रिझर्व्हेशन लीग, आर्ट डेको अलाइव्ह आणि भाऊ दाजी लाड संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. या प्रदर्शनामध्ये सर्वत्र नजर टाकली असता मुंबई आणि मियामी शहरावर एकसमान स्थापत्यप्रभाव दिसून आला. दोन्ही शहरे शेकडो किलोमीटर दूर असले तरीही दोन्ही शहर आर्ट डेको इमारतीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. मुंबईतील जवळपास १,५०० इमारती या आर्ट डेकोमध्ये येतात. मुंबईतील आर्ट डेको इमारती म्हणजे दक्षिण मुंबई, ओव्हल मैदान आणि मरीन ड्राइव्ह यांचा आवर्जून उल्लेख होतो; परंतु हे एक मिथ असून आर्ट डेको इमारती या मुंबई शहरात सर्वत्र आहेत. यामध्ये शिवाजी पार्क सर्वात मोठे आहे. त्यानंतर, सायन, माटुंगा, विलेपार्ले वांद्रे (प.) इथेही या इमारती दिसून येतात, अशी माहिती आर्ट डेको अलाइव्हच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर तिनाझ नूशियान यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतींना वक्र बाल्कनी, पोर्टहोल खिडक्या, पेस्टल रंगांचे दर्शनी भाग आणि सनबर्स्ट मोटिफ्स (सूर्याची किरणे दर्शवणारे नक्षीकाम) आहेत. आयकॉनिक ‘इरोस सिनेमा’ आणि ‘गेलॉर्ड रेस्टॉरंट’ याच शैलीत बांधलेल्या आहेत. १९२५ नंतर मुंबईत उदयास आलेल्या आर्ट डेको स्थापत्यशैलीची ही उत्तम उदाहरणे आहेत. या शैलीने मुंबईच्या वास्तुकलेवर मोठा प्रभाव पाडला आहे. दक्षिण आणि उत्तर मुंबईत १,३५० आर्ट डेको इमारतींची नोंदणी झाली आहे. आर्ट डेको ही शैली केवळ इमारतींपुरती मर्यादित नाही, तर फर्निचर, दागिने, प्रकाशयोजना, वस्त्रे, ग्राफिक डिझाइन, ऑटोमोबाईल्स आणि अगदी सिनेमामध्येही दिसून येते.

मराठी वास्तुविशारदांचे योगदान
आर्ट डेको ही संकल्पना नक्कीच युरोपातून आली असली तरीही मुंबईतील आर्ट डेको इमारतीही परदेशी वास्तुविशारदांनी नव्हे भारतातील मराठी, गुजराती आणि पारशी या वास्तुविशारदांनी बांधकामात मोलाचे योगदान दिले आहे. मास्टर साठे, गजानन म्हात्रे, मराठे आणि कुलकर्णी या वास्तुविशारदांच्या नावांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गजानन म्हात्रे यांनी हिरा महल तर मराठे-कुलकर्णी या दोन वास्तुविशारदांनी भागीदारीत काम सुरू केले. दादर शिवाजी पार्क, सायन, माटुंगा येथे व्यापक प्रमाणात निवासी इमारीत बांधल्या आणि उदयोन्मुख मध्यमवर्गीय समाजाच्या राहणीमानाला आकार दिला.

मियामीतील लिंकन आणि मेट्रो सिनेमागृहातील साधर्म्य
मुंबईतील मेट्रो सिनेमागृह आणि मियामी येथील लिंकन सिनेमागृह या दोन्हीचे वास्तुविशारद हे थॉमस डब्ल्यू लॅम्ब आणि डेव्हिड डिचबर्न हेच असून मियामी येथील लिंकन सिनेमागृह १९३६ मध्ये बांधण्यात आले होते. तर मेट्रो सिनेमागृह हे १९३८ मध्ये उभारण्यात आले दोन्ही सिनेमागृहांचे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्यातील साधर्म्य असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, मियामीतील कॉलनी सिनेमागृह तर मुंबईतील रिगल सिनेमागृह यांचे वास्तुविशारद भिन्न असले तरीही दोन्ही इमारतींची आकृती मिळतीजुळती आहे.

डेको आर्ट म्हणजे काय?
डेको आर्ट ही एक डिझाइन शैली आहे, जी १९२० आणि १९३०च्या दशकात फ्रान्समध्ये सुरू झाली आणि जगभरात लोकप्रिय झाली. या शैलीमध्ये भौमितिक आकार, ठळक रेषा, चकचकीत आणि आकर्षक साहित्य (जसे की सोने, चांदी आणि चकचकीत धातू) यांचा वापर केला जातो. ही आधुनिक शैली आहे, जी समृद्धी, ग्लॅमर आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव दर्शवते. जगभरात पहिल्या महायुद्धानंतर सिमेंट कॉक्रीट इमारतींच्या बांधकामात या शैलीचा अवलंब करण्यात आला. जगभरातील अनेक शहरांवर याचा मोठा प्रभाव दिसून येतो.

डेको आर्टचा प्रभाव
डेको आर्टचा प्रभाव केवळ वास्तुकला आणि फर्निचरमध्येच नाही, तर फॅशन, दागिने, गाड्या आणि अगदी चहाच्या संचांमध्येही दिसून येतो. एम्पायर स्टेट बिल्डिंग हे या शैलीचे एक उत्तम उदाहरण आहे.

या प्रदर्शनीच्या माध्यमातून अनेकांना मुंबईची ओळख असलेल्या आर्ट डेको इमारतीची नव्याने ओळख झाली. मरीन ड्राइव्ह आणि मियामी शहरे किती मिळतीजुळती आहेत ते अनेकांना पहिल्यांदा कळले. या प्रदर्शनीमुळे इतिहासाला उजळणी मिळाली.
- अतुल कुमार, अध्यक्ष, नरिमन पॉइंट चर्चगेट रहिवासी असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

Kolhapur Muncipal : मनपा निवडणूक आचारसंहिता लागू होताच कारवाई; कोल्हापुरात इच्छुकांचे फलक हटवले

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

SCROLL FOR NEXT