मुंबई

स्क्रीनटाईम वाढल्याने मुलांची एकाग्रता हरवतेय!

CD

स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांची एकाग्रता हरवतेय!
इंद्रजित देशमुख यांची खंत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे पालकांबरोबर मुलांचा ही स्क्रीन टाइम वाढत आहे आणि तो कमी करण्यासाठी मुलांशी संवाद साधा, त्यांना फिरायला घेऊन जा, तसेच त्यांच्याबरोबर खेळा, कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचे असेल तर एकाग्रता आवश्यक आहे; मात्र मुलांचा स्क्रीन टाइम वाढल्यामुळे त्यांची एकाग्रता हरवत चालली आहे, अशी खंत निवृत्त प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केली.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने लालबाग येथे आयोजित केलेल्या ६८व्या विवेकानंद व्याख्यानमालेत ‘आभासी जगातील पालकत्व’ या विषयावर चौथे पुष्प गुंफले. हुकूमशाह पालक, घाबरट पालक, तटस्थ पालक, रूढीवादी पालक आणि सुजाण पालक असे पालकांचे पाच प्रकार आहेत. मुले लहान असताना त्यांना कुंपण घालण्याची आवश्यकता असून मुले मोठी होत असताना त्यावर भोवतालच्या म्हणजे समाज, कुटुंबाचा परिणाम ८० टक्के होत असतो, असेही देशमुख पुढे म्हणाले. भारताची भविष्यातील तरुण पिढी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिजमधील हिंसा, घृणा बघण्यात वेळ खर्ची घालत असून त्यामुळे ते आक्रमक होत आहेत, अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. याप्रसंगी महानगर बँकेचे संचालक सतीश खणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी वेदिका शिंदे आणि पीयूष तिवारी यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : गॅससाठी नागरिकांच्या रांगाच रांगा

SCROLL FOR NEXT