मुंबई

सांताक्रूझमध्ये पारा घसरला

CD

सांताक्रूझमध्ये पारा घसरला
मोसमातील नीचांकी नोंद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबईत शहरात हिवाळ्याची चाहूल अधिक गडद होत असून सांताक्रूझ येथे तापमानात लक्षणीय घट नोंदली गेली आहे. रविवारी (ता. ३०) रोजी सकाळी ८.३० वाजता सांताक्रूझ केंद्रात किमान तापमान १५.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे सामान्यापेक्षा ४.४ अंशांनी कमी असून हे या मोसमातील नीचांकी तापमान ठरले. यामुळे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थंडीची जाणीव अधिक तीव्र झाली आहे.
कुलाब्यात किमान तापमान २३ अंश, तर दिवसभरात कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांच्या दरम्यान राहिले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरांत सकाळी हलका धुरकटपणा दिसणार असून दिवसभर आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबरसाठी मुंबईतील कमाल तापमान ३२ अंश, तर किमान २३ अंश राहण्याचा अंदाज होता. तथापि, प्रत्यक्ष नोंदवलेल्या आकडेवारीनुसार सांताक्रूझ परिसरात तापमान आणखी घसरले असून हवा तुलनेने कोरडी असल्याने (आर्द्रता सकाळी ५८ टक्के) थंडीची जाणीव अधिक होत आहे. शहरात गेल्या दोन दिवसांत तापमानात घट झाल्यामुळे सकाळच्या सत्रात थंडीची जाणीव होत आहे. डिसेंबरचा पहिला आठवडा असल्याने पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे जागतिक शेअर बाजारात भूकंप, 'या' कंपन्यांचे शेअर्स गडगडले

Manoj Jarange Patil: सातारा गॅझेट लागू न झाल्यास पुन्हा आंदोलन: मनोज जरांगे पाटील, सात तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित!

Sahyadri tiger reserve update : ‘सह्याद्री प्रकल्प’मध्ये ‘शिलेदार’ची एन्ट्री, ‘तारा’सोबत जमणार का जोडी? निसर्गप्रेमींसाठी उत्सुकता

Israel-Iran war: इस्त्राईल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेल संपणार; अफवांमुळे पंपांवर वाहनधारकांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण : नाशिकमधील डॉ. अमोल पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT