मुंबई

साकीनाक्याचा विकासाचा सर्वात मोठा अडथळा दूर

CD

साकीनाक्याच्या विकासातील मोठा अडथळा दूर
ग्रीन झोन आणि स्मशानभूमीवर महत्त्वाचे निर्णय
घाटकोपर ता. २ (बातमीदार) : साकीनाका परिसराच्या विकासातील 'ग्रीन झोन' आणि 'हिंदू स्मशानभूमी' या दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर नुकतीच मंत्रालयात पालकमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने निर्णायक बैठक पार पडली. यावेळी नगर विकास विभागाचे अधिकारी, मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि इतर सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या मागणीनुसार, प्रभाग १५८ आणि १५९ मधील विकासाला खिळ बसवणारा ग्रीन झोन हटवण्याबाबत धोरणात्मक बदल सुचवण्यासाठी सखोल अभ्यास करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.

तर खैरानी रोड येथील कै. आनंदीबाई सुर्वे मैदान शेजारील हिंदू स्मशानभूमीचे काम जलद गतीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. या कामाची निविदा पुढील ४५ दिवसांत काढून कामाला त्वरित सुरुवात करण्याची सूचना केली गेली आहे. हा प्रस्ताव नगरसेवक प्रकाश मोरे यांनी २०१७-१८ साली दिला होता. या बैठकीमुळे साकीनाक्याच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा दूर झाल्याबद्दल प्रकाश मोरे आणि भाजप कार्यकर्त्यांकडून मंत्री आशिष शेलार यांचे आभार मानले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : धुळे ग्रामस्थांच्या मदतीने 5 दरोडेखोर गजाआड, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Kumbh Mela : सिंहस्थात भाविकांची पायपीट थांबणार! गोदाघाटाजवळच उभारली जाणार अंतर्गत वाहनतळे

SCROLL FOR NEXT