मुंबई

थॅलेसीमिया ग्रस्त मुलांना असुरक्षित रक्त संचारणमुळे एचआयव्ही संक्रमण होण्यापासून वाचवणे आवश्यक : डॉ. रुघवानी

CD

थॅलेसेमियाग्रस्त मुलांना असुरक्षित रक्त संचारणमुळे एचआयव्ही संक्रमण
जागतिक एड्स दिनानिमित्ताने तज्ज्ञांनी केली जागरूकता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : जागतिक एड्स दिन साजरा होत असताना एक आठवडाआधी झारखंडमधील एका रुग्णालयात संक्रमित रक्तामुळे पाच मुलांना एचआयव्ही झाल्याची बातमी समोर आली. या घटनेमुळे या रक्तरोगाने पीडित मुलांची अतिशय संवेदनशील स्थिती आणि त्यांना असुरक्षित रक्त संक्रमणापासून वाचवण्याची गरज अधोरेखित केली, असे बालरोगतज्ज्ञ आणि थॅलेसेमिया अँड सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले.
विश्व एड्स दिनाच्या निमित्ताने सोमवारी त्यांनी सांगितले की झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथील रुग्णालयात झालेल्या या घटनेने देशात आणखी मजबूत रक्त-सुरक्षा प्रोटोकॉलची आवश्यकता प्रकर्षाने समोर आणली आहे. तसेच, यामुळे देशात एचआयव्हीग्रस्त व्यक्तींची संख्या आणखी कमी करण्यात मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
थॅलेसेमियाग्रस्त मुलांना आयुष्यभर नियमित रक्त संचारणाची आवश्यकता असते. त्यामुळे ते रक्त सुरक्षितता आणि असुरक्षित रक्तामुळे होणारे एचआयव्ही, हिपॅटायटिस आणि इतर संक्रमणांच्या धोक्याच्या दृष्टीने अतिसंवेदनशील गटांमध्ये मोडतात, असे डॉ. रुघवानी म्हणाले.
ज्या कुटुंबात थॅलेसेमियाग्रस्त एकापेक्षा जास्त मुले आहेत, त्यांच्या दृष्टीने हा खर्च खूप वाढतो. प्रत्येक मुलाला महिन्यातून दोन ते तीन वेळा रक्त संक्रमण लागते, शिवाय रोग-व्यवस्थापनासाठी आणि मोसमी संक्रमणांसाठी औषधेही लागतात, कारण त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते, असेही रुघवानी म्हणाले.

विनामूल्‍य रक्‍त
डॉ. रुघवानी यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सर्व थॅलेसेमिया रुग्णांना रक्त व रक्तघटक विनामूल्य उपलब्ध करून दिले जातात आणि सर्व रक्तबँकांना हा पुरवठा मोफत करणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran conflict : अमेरिका, इस्राईलनंतर आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीही इराण विरोधात युध्दात उतरले

छावासाठी पुरस्कार जिंकताच विकी कौशलची पोस्ट, पोस्टवर संतोष जुवेकर कमेंट करत म्हणाला...

Latest Marathi News Live Update : कामठीत ‘जुलूस-ए-ग़म’ रॅली, खामेनी यांच्या निधनानंतर शोकमिरवणूक

Iran-Israel conflict: इराण-इस्रायल संघर्षात पुणेकर संकटात? सुरक्षित परतीसाठी महापालिकेची तातडीची हालचाल

Jalna News : जालना ड्रायपोर्ट महिनाभरात होणार सुरू! ४२५ एकरांवरील प्रकल्पातून मराठवाडा-विदर्भाची उत्पादने आता थेट परदेशात जाणार

SCROLL FOR NEXT