शिष्यवृत्तीची आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ
मुंबई, ता. १ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२५पर्यंत मुदत देण्यात आली होती; मात्र आता ८ डिसेंबर २०२५पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शाळांनी अद्याप ऑनलाइन आवेदनपत्र भरले नसेल त्यांनी नियमित शुल्कासह ८ डिसेंबरपर्यंत शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाइन भरावयाचे आहे. विलंब शुल्कासह १५ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह २३ डिसेंबर तर अतिविशेष विलंब शुल्कासह ३१ डिसेंबर २०२५पर्यंत ही माहिती भरता येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, असेही परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.