मुंबई

‘सीएमओ’तील अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक

CD

‘सीएमओ’तील अधिकारी
असल्याचे सांगून फसवणूक

सराफाला दाेन काेटी ८० हजार रुपयांना लुटले

मुंबई, ता. १ : मुख्यमंत्री कार्यालयात प्रथम वर्ग अधिकारी असल्याचे भासवून शहरातील सराफाची तब्बल २.८० कोटींची फसवणूक करणाऱ्या भामट्याविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी २८ नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला आहे. वैभव ठाकर असे भामट्याचे नाव आहे.

वैभवसोबत त्याची पत्नी, सासू आणि तक्रारदारासोबत परिचय करून देणारा दलाल यांनाही आरोपी करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तक्रारदाराचे नाव शैलेश जैन असून, त्यांचे झवेरी बाजार येथे कार्यालय आहे. त्यांच्यासोबत नियमित व्यवहार करणाऱ्या बिरजू सल्ला या दलालाने त्यांची आणि आरोपी वैभवची ओळख करून दिली होती. वैभवने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रथम वर्ग अधिकारी असल्याचे सांगितले. तक्रारदाराकडे येताना वैभव पिवळा दिवा असलेल्या कारमधून येत असे. त्यामुळे तक्रारदाराचा त्याच्यावर विश्वास बसला. वैभव याने स्वतःच्या पोस्टिंगचे निमित्त करून प्रथम २० लाख रुपये तक्रारदाकडून घेतले. त्यानंतर सीमा शुल्क विभागात ओळख असून जप्त केलेले सोने सात टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतो; सासू सोन्या-चांदीचे, हिऱ्यांची ऑनलाइन विक्री करते, असे सांगून अनुक्रमे १.१५ कोटी रुपये आणि १.३५ कोटी रुपये मूल्य असलेले दागिने घेतले. त्यानंतर मात्र त्याने कामे न केल्यामुळे तक्रारदाराने रकमेची मागणी केली. त्यावर त्याने सुरुवातीला टाळाटाळ केली. नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यासह कार्यालयात येऊन तक्रारदार व त्याच्या मुलाला धमकावले, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने वैभव याच्याविरोधात पोलिस तक्रार केली होती. त्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला; मात्र वैभवने सक्तवसुली संचालनालयाकडे केलेल्या तक्रारीआधारे तक्रारदार शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यात ते दीड महिना अटकेत होते, असेही पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Kolhapur Wildlife Attack : अवघ्या सव्वा वर्षांच बाळ वडिलांच्या कुशीत शांत झोपलं अन् कोल्ह्याने बरोबर हेरलं; कोल्हापूरच्या चंदगडमध्ये घडलं भयानक

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प

Nagpur Gas Cylinder Price: धुराचे लोट; गॅस टंचाईमुळे गृहिणी पुन्हा चुलीकडे! सरपण गोळा करण्यासाठी महिलांची वणवण

SCROLL FOR NEXT