मुंबई

ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाचे खोदकाम

CD

ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गाचे खोदकाम
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टनेल बोरिंग मशीनच्या कामाला सुरुवात; दुहेरी बोगदा मार्ग तीन वर्षांत पूर्ण होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : पूर्व मुक्‍त मार्गासह अटल सेतूवरून आलेल्या वाहनधारकांना कोणत्याही वाहतूक कोंडीशिवाय मरीन ड्राइव्ह, कोस्टल रोड, नरिमन पॉइंट परिसरात पोहोचता यावे, यासाठी एमएमआरडीएकडून ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह असा सुमारे साडेनऊ किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा (भुयारी) मार्ग तयार केला जात आहे. त्याच्या खोदकामाला आज (ता. ३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्‍ते टनेल बोरिंग मशीनच्या (टीबीएम) कामाला सुरुवात करून झाली.
दाट दाटीवाटीच्या शंभर वर्षे जुन्या इमारती, मध्य आणि पश्चिम रेल्वे, मेट्रो-३ च्या भुयारी मार्गाखालून हा बोगदा मार्ग जाणार आहे. पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण हाेईल. त्यामुळे फोर्ट, नरिमन पॉइंट परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीला अधिक वेगवान करण्यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो, उन्नत मार्ग, सागरी सेतू, भुयारी मार्गाची कामे हाती घेतली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून एमएमआरडीएने ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे. त्यासाठी आवश्यक बोगदा प्रवेशद्वार तयार झाल्यानंतर पुढील कामाला सुरुवात झाली आहे. पूर्व मुक्‍त मार्गावरून उतरल्यानंतर पुढे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथे सुरुवातीला उन्नत मार्ग उभारण्याची संकल्पना होती, मात्र दैनंदिन वाहतूक सुरू ठेवून दाटीवाटीच्या वस्तीत काम करणे कठीण होते. त्यामुळे आम्ही मूळ संकल्पना बाजूला ठेवून भुयारी मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, आजपासून प्रत्यक्ष बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हे काम मोठे आव्हानात्मक असले तरी एमएमआरडीए आणि एल अँड टीने डिसेंबर २०२८ पूर्वी पूर्ण करून मुंबईकरांना दिलासा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल शेवाळे, ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमीन पटेल, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विनी मुद्गल, आस्तिक पांडे, एमएमओसीएलच्या रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.

७०० इमारतींखालून बोगदा जाणार
ऑरेंज गेट-मारीन ड्राइव्ह हे सुमारे साडेचार किलोमीटरचे अंतर आहे. हा बोगदा जात असलेल्या मार्गावर शंभर वर्षांहून जुन्या इमारती असून, त्याला धक्का न लावता हा बोगदा तयार केला जाणार आहे. तसेच भुयारी मेट्रो-३ च्या ५० मीटर खालून हा बोगदा असणार आहे. त्यामुळे याकडे अभियांत्रिकी चमत्कार म्हणून पाहिले जाईल, असे फडणवीस म्हणाले.

दुसऱ्या टनेलचे काम लवकरच
या भुयारी मार्गावर सुमारे सव्वातीन किलोमीटरचा एक याप्रमाणे दोन बोगदे असणार आहेत. दोन नियमित आणि एक आपत्कालीन मार्गिका असणार आहेत. त्यापैकी एका टनेलचे काम सुरू झाले असून, दुसऱ्या टनेलच्या खोदकामाची सुरुवात होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
एकूण खर्च - ८,०५६ कोटी
एकूण लांबी - ९.९६ किलोमीटर
दुहेरी बोगद्याची लांबी - ७ किलोमीटर
- प्रत्येक बोगद्यात ३.२ मीटर रुंदीचे २ पदरी रस्ते, १ पदरी आपत्कालीन रस्ता असेल
- तशी वेग मर्यादा ८० किमी
- दोन्ही बोगदे सुरक्षिततेच्या दृष्टीने एकमेकांशी प्रत्येकी ३०० मी. अंतरावर क्रॉसपॅसेजद्वारे जोडले जातील.

प्रकल्पाचे मुख्य फायदे
- मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाईल.
- प्रवासाचा वेळ १५-२० मिनिटांनी कमी होईल.
- इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार
- ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

टनेल बोरिंग मशीन
प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या टीबीएमचे नूतनीकरण आणि पुनर्निर्मितीचे काम स्थानिक पातळीवर मूळ टनेल बोरिंग मशीन उत्पादक यांच्या देखरेखीत करण्यात आले आहे.
- कटर हेड व्यासः १२.१९ मीटर
- लांबी: ८२ मीटर
- वजनः अंदाजे २, ४०० मेट्रिक टन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर, सरकारने जारी केली ही महत्त्वाची नोटीस

Solapur News: २० टक्के प्रमाणपत्रे खोटी! साेलापूरात कामगारांना अनुभव प्रमाणपत्र देणारे ठेकेदारही बोगस;'कामगार मंडळा’कडून तपास सुरू..

Ajay Devgn: ‘शैतान २’चा इशारा? दोन वर्षांनंतर अजय देवगच्या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता वाढवली!

Success Story: आदिवासी युवकाची मेळघाटातून ब्रिटनपर्यंतची झेप; चिलाटी येथील किशोर बेठेकर यांना ब्रिस्टल विद्यापीठात प्रवेश

Latest Marathi News Live Update : कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT