मुंबईतील मतदार याद्यांवर
साडेसात हजार हरकती
निवडणुकीपूर्वी त्रुटी दुरुस्त करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : महापालिकेच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना नोंदवण्याचे ३ डिसेंबरपर्यंत मुदत होती. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्यात आल्याने एकूण तक्रारींची संख्या ७,४५२ हरकती नोंदवण्यात आल्या. त्यात सर्वाधिक १,५८१ हरकती एम/पूर्व विभागात, सर्वात कमी दोन हरकती बी विभागात नोंदवण्यात आल्या. त्यामुळे विविध भागांत मतदार याद्यांमध्ये मोठी विसंगती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर नागरिकांना ३ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार होत्या. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. २७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान चार दिवसांत अडीच हजारांहून अधिक हरकती आल्या. त्यात प्रामुख्याने नाव वगळले जाणे, एका प्रभागातील मतदाराचे नाव दुसऱ्यात आढळणे, पत्त्यांमध्ये विसंगती, तसेच चुकीची माहिती नोंदवली जाणे, अशा तक्रारींचा यात समावेश होता. २ डिसेंबरपर्यंत ५४९४ हरकती नोंदलेल्या असताना, शेवटच्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी आणखी १९५८ हरकती/सूचना दाखल झाल्या. अंतिम क्षणी नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे अनेक प्रभाग कार्यालयांमध्ये दिवसभर कामकाज सुरू होते. निवडणुकीपूर्वी मतदारांची अद्ययावत आणि अचूक यादी तयार करण्यासाठी या हरकती विचारात घेतल्या जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
......
प्रभागनिहाय सर्वाधिक हरकती
एम/पूर्व १,५८१
एल ८५९
एन ६०८
के/पश्चिम ४७४
एच/पूर्व २२२
पी/पूर्व २२७
आर/दक्षिण २३०
टी १८५
आर/मध्य १५४
......
सर्वात कमी हरकती
बी २
ए ११
सी १०
एम/पश्चिम ११
डी ३७
एफ/दक्षिण २४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.