मुंबई

पोलिसांचे पगार आता बडोदा बँकेत

CD

पोलिसांचे पगार
आता बडोदा बँकेत
खाती उघडण्याची प्रक्रिया सुरू
मुंबई, ता. ३ ः मुंबई पोलिस दलातील तब्बल ४५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदात होणार आहे. त्यासाठी या बँकेत खाती उघडण्यासाठी सर्वांकडून आवश्यक तपशील मागविण्यात आले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाईल, असे सांगण्यात आले.
२००३ ते २०२० या काळात मुंबई पोलिस दलाचा पगार ॲक्सिस बँकेतून होत होता. पुढे तो एचडीएफसी बँकेत वळवण्यात आला. एचडीएफसी बँकेसोबतचा करार संपल्यानंतर अन्य बँकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. त्यात बँक ऑफ बडोदाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या बँकेने वेतन खात्यांवर पोलिसांना कौटुंबिक वैद्यकीय विमा सुविधा देण्याचे प्रस्तावात नमूद केल्याने तो मंजूर करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
प्रस्ताव मंजूर केल्यानंतर अतिरिक आयुक्त स्तरावर अखत्यारीतील सर्व पोलिस अधिकारी, अंमलदारांचे नवी खाती सुरू करण्यासाठी तपशील आणि आवश्यक कागदपत्रे मागविण्यात आली. निम्म्या पोलिस दलाने तपशील सादर केले आहेत, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Nashik IVF Centers : स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून १२ आयव्हीएफ सेंटर्सची तपासणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अनिल बोंडे यांच्याकडून टीका

SCROLL FOR NEXT