मुंबई

बाबासाहेबांना पुस्तकरूपी आदरांजली

CD

बाबासाहेबांना पुस्तकरूपी आदरांजली
पुस्तक विक्रीतून १० कोटींची उलाढाल; संविधान, चरित्र ग्रंथांना मागणी
नितीन जगताप : सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुस्तकरूपी आदरांजली अर्पण करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. बाबासाहेबांना वंदन केल्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी आपला मोर्चा थेट पुस्तक खरेदीकडे वळवल्याचे चित्र चैत्यभूमी परिसरात पाहायला मिळाले. बुकस्टॉलवर रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी पुस्तक विक्रीचा आकडा तब्बल १० कोटींच्या पुढे गेल्याचे सांगण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील डॉ. केशव पवार यांनी दरवर्षीप्रमाणे ६ डिसेंबरला न चुकता चैत्यभूमीवर हजेरी लावली. कॉलेजमध्ये विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले पवार यांनी मोठ्या प्रमाणात पुस्तके खरेदी केली. यात प्रामुख्याने बार्टी प्रकाशित ग्रंथांचा समावेश होता. अनेक महत्त्वाचे ग्रंथ उपलब्ध नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

केशव पवार यांच्याप्रमाणे महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पुस्तकांच्या माध्यमातून वैचारिक शिदोरी घरी नेण्याची परंपरा आंबेडकरी अनुयायांनी कायम ठेवली. चैत्यभूमी परिसरात या वेळी २८०हून अधिक प्रकाशकांनी आपले बुकस्टॉल लावले होते. बाबासाहेबांचे आणि पुस्तकांचे नाते विशेष हाेते. त्यामुळेच त्यांना अभिवादन केल्यानंतर लाखो अनुयायांचे पाय आपोआप बुकस्टॉलकडे वळतात. ग्रामीण भागातून आलेले अशिक्षित आईवडीलही भीमविचारांचा वारसा आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तके खरेदी करतात, असे पुस्तक विक्रेते सुनील शिंदे  तसेच अंकिता माने यांनी सांगितले. एससी, एसटी असोसिएशनचे सचिव जितेंद्र कांबळे यांनी दोन लाख रुपये किमतीची बाबासाहेबांवर आधारित आणि करिअर मार्गदर्शनपर पुस्तके माेफत वाटल्याचे सांगितले. दलित पँथर चळवळीवर आधारित पुस्तके खरेदी केल्याचे विद्यार्थिनी शर्वरी पवार यांनी सांगितले.  


या पुस्तकांना मागणी
‘शुद्र पूर्वी कोण होते?’, ‘हिंदू कोड बिल’, ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’, ‘माझी आत्मकथा’ या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांना नेहमीप्रमाणेच मोठी मागणी होती. याबराेबरच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : कौटुंबिक जीवन आठवणी’, ‘गुलामगिरी’, ‘मुक्ती कोण पथे?’, ‘मध्यमयुगीन भारताचा इतिहास’, ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

संविधान पुस्तिकेला मागणी
बार्टीच्या स्टॉलवर दिवसभरात सवलतीच्या दरातील १५ हजारांहून अधिक पुस्तके विकली गेली. त्यापैकी सर्वाधिक मागणी ‘भारतीय संविधान’ पुस्तकाला होती. याशिवाय शासकीय मुद्रणालयाने प्रकाशित केलेली राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे यांच्यावरील चरित्र पुस्तकेही मोठ्या प्रमाणात विकली गेली. पुस्तकांसाठी अनेकांनी लांबलचक रांगा लावल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते.
===
एका दिवसापूर्वी प्रकाशित झालेल्या लेखक ज. वि. पवार यांच्या ‘आंबेडकरी चळवळ - दशा, दुर्दशा आणि दशा’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती पहिल्याच दिवशी संपली. स्टॉलवरची सर्व पुस्तके हातोहात विकली गेली. याशिवाय देशभरातून आलेल्या ऑनलाइन ऑर्डर पूर्ण करायच्या आहेत.
- तेजविल पवार, अस्मिता प्रकाशन
.....
‘प्रिय रामू’ या रमाबाईंच्या जीवनावर आधारित पुस्तकाला सर्वाधिक मागणी होती. त्याखालोखाल ‘पाचट’ या आत्मचरित्राला मागणी होती.
- योगीराज बागूल, पेरणी, प्रकाशन संस्था
...
विविध विषयांवरील वैचारिक, साहित्यिक आणि महापुरुषांच्या विचारधारेचे ग्रंथ या दिवशी एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. त्यामुळे असंख्य संशोधक, प्राध्यापक येथे येऊन पुस्तक खरेदी करतात.
- प्रा. डॉ. सुनील गायकवाड, सातारा
..

.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

SCROLL FOR NEXT