मुंबई

म्हाडाची गोरेगाव पत्राचाळीत एकाच ठिकाणी २३९८ घरे

CD

म्हाडाची पत्राचाळीत एकाच ठिकाणी २,३९८ घरे
महिनाभरात काम सुरू होणार; पर्यावरण विभागाकडून परवानगी
बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ ः मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांचे परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. गोरेगाव पत्राचाळ परिसरात चार भूखंडांवर एकाच ठिकाणी तब्बल २,३९८ घरे उभारली जाणार आहेत. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी सर्वाधिक घरे असलेला हा मोठा प्रकल्प महिन्याभरात प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या या प्रकल्पाला पर्यावरण आणि वन विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. तसेच, ३८ ते ४० मजल्यांच्या म्हणजेच १२० मीटर उंचीच्या इमारतींना विमानतळ प्राधिकरणानेही हिरवा कंदील दाखवला आहे. आवश्यक परवानग्या मिळाल्याने या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम महिन्याभरात सुरू होऊ शकेल, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मुंबईत खासगी विकसकांकडे घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे त्यांना म्हाडाच्या लाॅटरीची प्रतीक्षा असते; मात्र यंदा पुरेशी घरे उपलब्ध न झाल्याने म्हाडाकडून घरांची लाॅटरी जाहीर केलेली नाही. दरम्यान, पुढील दोन-तीन वर्षांत मुंबईकरांना मोठ्या संख्येने घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी म्हाडाकडून नियोजन सुरू आहे. त्यानुसार गोरेगाव पत्राचाळ येथे असलेल्या आर-१, आर-४, आर-७ अ-२ आणि आर-१३ या चार भूखंडावर ३८-४० मजली इमारती उभारण्याचे नियोजन केले असून त्याला आवश्यक परवानग्या मिळाल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यामध्ये २,२६५ घरे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी तर १३३ घरे उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी असणार आहेत. या प्रकल्पातील इमारती उभारण्याचे काम शिर्के कन्स्ट्रक्शन, शिवबान सिंग, देव इंजिनिअर्स या कंपन्यांना दिले असून महिन्याभरात सुरू होणार आहे. तसेच पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.


-----
कोणत्या भूखंडावर किती घरे?
आर १ भूखंड - ५७२
- मध्यम उत्पन्न गट - ५०४ घरे (७७० चौरस फूट)
- उच्च उत्पन्न गट - ६८ घरे (१,०१० चौरस फूट)
---
आर ४ भूखंड - १,०२५ घरे
- अल्प उत्पन्न गट - ७०७ घरे (४७५ चौरस फूट)
- मध्यम उत्पन्न गट - ३१८ घरे (७६३ चौरस फूट)
---
आर ७/अ२ भूखंड - ५७८ घरे
- अल्प उत्पन्न गट - ३१६ घरे (४८० चौरस फूट)
- मध्यम उत्पन्न गट - २६२ घरे (८३० चौरस फूट)
---
आर १३ भूखंड - २२३ घरे
- मध्यम उत्पन्न गट - १५८ घरे (७४० चौरस फूट)
- उच्च उत्पन्न गट - ६५ घरे (९९३ चौरस फूट)
-------
घरांचा तपशील
- अल्प, मध्यम उत्पन्न गटासाठी - २,२६५
- उच्च उत्पन्न गटासाठी - १३३
- एकूण घरे - २,३९८
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: लाइव्ह शो, स्पोर्ट्स आणि इव्हेंट्सचे नवे ठिकाण... नवी मुंबई देशाचं एंटरटेनमेंट हब बनणार! सिडकोचा भव्य एरिना प्रकल्प काय आहे?

MPSC Exam Postponed : MPSC ची २१ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नगरपरिषद निवडणुकांच्या निकालांमुळे निर्णय

मुलं न होऊ देण्याचा निर्णय चुकला नाही... लोकप्रिय अभिनेत्रीचं स्पष्ट मत; यावर पर्ण पेठे म्हणाली- माझ्या वयात...

Latest Marathi News Update : MPSC परीक्षा पुढे ढकलली

ZP Exam Controversy : उच्च जातीचे नाव काय? जिल्हा परिषदेच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत संतापजनक प्रश्न...

SCROLL FOR NEXT