मुंबई

(मुंबई टुडे)मुंबईतील शाळांना बाह्य मूल्यांकनासाठी अल्टिमेटम

CD

शाळांना बाह्य मूल्यांकनासाठी अंतिम इशारा
शिक्षण विभाग सतर्क; १५ डिसेंबरपर्यंत माहिती भरण्याचे निर्देश

मुंबई, ता. ७ ः शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) राज्यातील अनुदानित, सरकारी आदी शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (स्क्वाफ)अंतर्गत स्वयं-मूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांचे बाह्य मूल्यांकनही केले जाणार आहे; मात्र अजूनही असंख्य शाळांनी आपल्या शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण केले नाही. यामुळे या शाळांच्या विरोधात शालेय शिक्षण सतर्क झाले असून १५ जुलैपासून आतापर्यंत तीन वेळा माहिती भरण्यासाठी मुदत देण्यात आल्याने यानंतर थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

एससीईआरटीच्या या मूल्यांकनात शाळांकडून विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण आणि त्यांच्या गुणवत्तेसंदर्भात विविध प्रकारची माहिती शाळांकडून भरून दिली जात आहे; मात्र अद्यापही मुंबईतील काही अनुदानित शाळांनी अनेकदा मुदत देऊनही ती माहिती भरण्यास टाळाटाळ केल्याने विभागाकडून आता १५ डिसेंबरपर्यंतची या शाळांना अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या संबंधित शाळांवर थेट कारवाई केली जाणार आहे.

मुंबईत विविध व्यवस्थापनाकडून चालविण्यात येत असलेल्या माध्यमिकच्या अनुदानित शाळांची संख्या ही ८४८ इतकी उरली आहे. तर प्राथमिकच्या महापालिकाअंतर्गत येणाऱ्या आणि इतर एकूण दोन हजार १७५ शाळा आहेत. यातील महापालिका शाळांची माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर असून काही खासगी अनुदानित शाळांची माहिती भरणे अद्यापही अपूर्ण राहिली आहे. यामुळे या शाळांना ही माहिती भरण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली असून त्यानंतर थेट या शाळा व्यवस्थापनांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाईच्या नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

शाळांच्या उणिवा येणार समोर
मूल्यांकनाच्या माध्यमातून सरकारी, अनुदानित, खासगी व्यवस्थापनाच्याही शाळांमधील शिक्षण, अध्यापन, विद्यार्थ्यांची प्रगती आणि समग्र शैक्षणिक वातावरणाची गुणवत्ता या संदर्भातील माहिती भरल्यानंतर संबंधित शाळांची प्रत्यक्ष पडताळणी करून सर्व विषयांची पाहणी केली जाणार आहे. यासाठी इतर विभागातील अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार असल्याने यात अनेक शाळांच्या अडचणी आणि उणिवाही समोर येण्याची अधिक शक्यता आहे.

शाळांना सक्षम बनवणे
राज्यातील प्रत्येक शाळांतील शैक्षणिक कार्य, त्यांच्यातील गुणवत्ता लक्षात घेऊन तसेच त्या शाळांमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या कमतरता आणि सुधारण्याच्या उपाययोजना करणे शक्य होणार आहेत. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धेारणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणात समान गुणवत्ता आणि मानके राखण्यासाठी या धोरणाच्या अंमलबजावणीनुसार त्यासाठीचे निर्देशही लागू केले जाणार आहेत.

शिक्षकांच्या संख्येचेही परीक्षण
मुंबईसह राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यासाठी असलेल्या शिक्षकांची संख्याही या मूल्यांकनाच्या माहितीत भरणे आवश्यक असल्याने यातून शिक्षकांची संख्या आणि त्यांचेही परीक्षण होणार आहे. शिवाय, शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा, डिजिटल साधने आदींचीही माहिती भरून घेतली जाणार आहे.

तीन वेळा मुदतवाढ
स्वयंमूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांचे बाह्यमूल्यांकन १५ जुलै ते ३१ जुलैनंतर ३० ऑगस्ट २०२५ अशी मुदतवाढ दिली होती; परंतु तरीदेखील शाळांचे बाह्यमूल्यांकन करणे हे प्रक्रिया शाळांसाठी अडचणीची ठरल्याने अनेक शाळांकडून त्यासाठी सहकार्य केले जात नसल्याचे दिसून आल्याने यासाठी विभागाकडून १५ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: लाइव्ह शो, स्पोर्ट्स आणि इव्हेंट्सचे नवे ठिकाण... नवी मुंबई देशाचं एंटरटेनमेंट हब बनणार! सिडकोचा भव्य एरिना प्रकल्प काय आहे?

MPSC Exam Postponed : MPSC ची २१ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नगरपरिषद निवडणुकांच्या निकालांमुळे निर्णय

मुलं न होऊ देण्याचा निर्णय चुकला नाही... लोकप्रिय अभिनेत्रीचं स्पष्ट मत; यावर पर्ण पेठे म्हणाली- माझ्या वयात...

Latest Marathi News Update : MPSC परीक्षा पुढे ढकलली

ZP Exam Controversy : उच्च जातीचे नाव काय? जिल्हा परिषदेच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत संतापजनक प्रश्न...

SCROLL FOR NEXT