मुंबई

समृद्धी महामार्ग सुसाट!

CD

समृद्धी महामार्ग सुसाट!
तीन कोटी वाहनांचा प्रवास; दैनंदिन सरासरी ५० हजार वाहनांची धाव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबई-नागपूर प्रवास अवघ्या आठ तासांत करता यावा, म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उभारलेला ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग सध्या सुसाट आहे. या मार्गावरून दररोज सरासरी ५० हजारांहून अधिक वाहने ये-जा करीत आहेत. हा मार्ग खुला झाल्यापासून नोव्हेंबरअखेरपर्यंत तब्बल दोन कोटी ९१ लाख वाहनांनी या मार्गाने प्रवास केला आहे. समृद्धी महामार्गावरून कमी वेळेत जास्त अंतर कापणे शक्य होत असल्याने विदर्भासह नाशिक, शिर्डीसह परिसरातून मोठ्या प्रमाणात कृषी माल मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने येत आहे.

‘एमएसआरडीसी’ने टप्प्याटप्प्याने समृद्धी महामार्गाची उभारणी करीत हा मार्ग खुला केला आहे. नागपूर-ते शिर्डी हा पहिला ५२० किलोमीटर लांबीचा टप्पा ११ डिसेंबर २०२२ला खुला करण्यात आला. त्यानंतर २६ मे २०२३ला शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा, तर ४ मार्च २०२४ला भरविर-इगतपुरी तिसरा टप्पा आणि अखेरचा इगतपुरी-आमने हा चौथा टप्पा ५ जून २०२५ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुला करण्यात आला. दरम्यान, अखेरचा आमने-इगतपुरी हा टप्पा सुरू झाल्याने संपूर्ण ७०१ किलोमीटरचा मार्ग प्रवासासाठी पूर्णपणे खुला झाला. त्यामुळे दिवसागणिक वाहनांची संख्या वाढत आहे. सुरुवातीला २५ ते २६ हजार एवढी कमी असलेली दररोजची वाहनसंख्या आता ५० हजारांच्या पुढे गेली असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ऑक्टोबरमध्ये १५ लाख १६ हजार तर नोव्हेंबरमध्ये १५ लाख २४ हजार वाहनांनी समृद्धीवरून प्रवास केला आहे. वाहनांचा आलेख वाढता असल्याने समृद्धी सुसाट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

...
वाहतूक कोंडीशिवाय मुंबईत
सध्या समृद्धीवरून आलेल्या वाहनधारकांना आमने-ठाणेदरम्यान मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. समृद्धीच्या दिशेने जातानाही तीच परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएकडून आमने-साकेत (ठाणे)दरम्यान सहा हजार कोटी रुपये खर्चून सुमारे २९ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे. तसेच साकेत-आनंदनगरदरम्यान उन्नत मार्ग तर आणि छेडानगर (घाटकोपर)-आनंदनगरदरम्यान पूर्व मुक्त मार्गाचा (ईस्टर्न फ्री वे) विस्तार केला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समृद्धीवरून आलेल्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीशिवाय मुंबईत पोहोचता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT