मुंबई

दोन दिवसांत ४७ मोबाईल लंपास

CD

दोन दिवसांत ४७ मोबाईल लंपास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबईत आलेल्या लाखो अनुयायांच्या गर्दीचा गैरफायदा चोरट्यांनी घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसांत उपनगरी रेल्वे, दादर रेल्वेस्थानकांसह उपनगरी रेल्वेस्थानकांमध्ये तब्बल ४७ मोबाईल फोन चोरीस गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्य सरकारने शनिवारी (ता. ६) मुंबई शहरात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे शासकीय कार्यालये बंद असली, तरी खासगी कार्यालये, कंपन्या व बाजारपेठा सुरू होत्या. त्यातच दादर येथील चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या प्रचंड गर्दीत लोकल गाड्या, फलाट, जिने आणि स्थानक परिसरात चोरट्यांनी सक्रिय होत प्रवाशांच्या मोबाईलवर हात साफ केला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मोबाईल चोरीच्या तक्रारी गर्दीने गजबजलेल्या वेळेत नोंदवण्यात आल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत खिशातून किंवा पिशव्यांतून मोबाईल लंपास केल्याचे प्रकार अधिक असल्याचे तपासात समोर येत आहे. याप्रकरणी संबंधित रेल्वे पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करून तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, अशा गर्दीच्या काळात प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष दक्षता घ्यावी, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT