मुंबई

वाढत्या प्रदूषणाची ‘एमपीसीबी’कडून दखल

CD

वाढत्या प्रदूषणाची ‘एमपीसीबी’कडून दखल
मुंबईसह ठाण्यातील ‘एक्यूआय’, ‘एसटीपी’ केंद्रांची आज पाहणी

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १० : मुंबई आणि ठाणे परिसरातील वाढत्या वायू व जल प्रदूषणाच्या गंभीर समस्येची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) अखेर दखल घेतली आहे. मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे गुरुवारी (ता. ११) मुंबईसह ठाण्यातील हवा गुणवत्ता मापन केंद्रे आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन, परिसरातील प्रदूषणाची आणि गुणवत्ता तपासणी यंत्रणांची पाहणी करणार आहेत.

सिद्धेश कदम यांच्या पाहणी दौऱ्यात मुंबई आणि ठाण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या प्रदूषण नियंत्रण केंद्रांच्या कामकाजाचा आणि प्रदूषणाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून या पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल. सर्वप्रथम डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वनोद्यान (एमसीजीएम गार्डन), माइंडस्पेस, मालाड (प.) येथे हवेच्या गुणवत्तेची मोजमापे आणि ‘एक्यूआय’चा डेटा तपासला जाईल. त्यानंतर आयआयटीएम, मालवणी अग्निशमन केंद्र जवळ, मालाड (प.) हवा गुणवत्ता मापन केंद्राचे कामकाज व त्याची अचूकता तपासली जाईल. यासह दहिसर नदीवरील दुसरा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचा दर्जा आणि नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणे, दुपारी जुने आर-नॉर्थ वॉर्ड कार्यालय जवळ, दहिसर (प.) सांडपाणी प्रकल्पाची पाहणी करतील. दहिसरनंतर ठाण्यातील कोपरी कन्हैया नगर येथील सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि एमजेपी कार्यालयाजवळील प्रकल्पाला भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतला जाणार आहे.

...
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
​एमपीसीबी अध्यक्षांच्या या थेट पाहणीमुळे प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना अधिक कठोर होण्याची शक्यता आहे. मुंबई-ठाण्यातील बिघडलेली हवा आणि जलस्रोत यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एमपीसीबी अध्यक्षांच्या या थेट पाहणीमुळे भविष्यात प्रदूषण नियंत्रणाचे नियम अधिक कडक केले जाण्याची आणि निष्काळजी प्रकल्पांवर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Dream Unfulfilled : ‘’धर्मेंद्र यांचे ‘ते’ स्वप्न अर्धवटच राहिले...’’, हेमा मालिनींनी प्रार्थना सभेत केला खुलासा!

IND vs SA, 2nd T20I: शुभमन गिलचा घरच्या मैदानावरही भोपळा! संजू सॅमसनला आता तरी खेळवा, चाहत्यांची मागणी

Viral : किती खाणेरडापणा! 19 मिनिट 30 सेकंद व्हिडिओचा पार्ट 2 व्हायरल? शेअर होतीये लिंक; पोलिसांची वॉर्निंग

Navale Bridge Accident: पुण्यातल्या नवले पुलाजवळील अपघात रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक; घेतला 'हा' निर्णय

Pune Harassment Case : गणेश पार्क ते लोहगाव परिसरात महिलांची छेडछाड करून पाळायचा; शेवटी आरोपी विमानतळ पोलिसांच्या सापळ्यात!

SCROLL FOR NEXT