मुंबई

चिंचेच्या गोळ्यातून गांजाची तस्करी

CD

चिंचेच्या गोळ्यातून गांजाची तस्करी

मुंबई : अमली पदार्थ किंवा सोन्याच्या तस्करीसाठी परदेशातील संघटित टोळ्या आणि त्यांचे वाहक (कॅरिअर) विविध क्लृप्ती वापरतात. सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत अशीच एक क्लृप्ती समोर आली. बँकॉकहून परतणाऱ्या एका प्रवाशाने चिंचेच्या गोळ्यात परदेशी गांजा (हायड्रोपोनिक वीड) दडवून आणला होता. या प्रवाशासह एकूण १० जणांना अटक करून सीमा शुल्क विभागाने तब्बल ४० किलो परदेशी गांजा जप्त केला. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ४० कोटींच्या आसपास असावी, असे सांगण्यात आले. ३ ते १० डिसेंबरदरम्यान नेमक्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बँकॉकहून परतणाऱ्या या प्रवाशांची आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाडाझडती घेण्यात आली. काहींनी चोरकप्पे असलेल्या बॅगेचा वापर गांजा वाहून आणण्यासाठी केला होता, तर काहींनी चिंचेच्या गोळ्यात गांजा दडवून आणल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या कारवाईत सीमा शुल्क विभागाने सोने आणि हिऱ्यांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक केली. अटक आरोपींकडून २.४० कोटींचे सोने आणि हिरे जप्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Latest Marathi News Live Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

SCROLL FOR NEXT