मुंबई

जाहिरात फलकांवर पालिकेची कारवाई

CD

जाहिरात फलकांवर पालिकेची कारवाई

मुंबई, ता. १६ : महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर तिची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. त्यानुसार उपआयुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २४ तासांत व्यापक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत सरकारी, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांवरील जाहिराती हटविण्यात आल्या असून, दोषींविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या अहवालानुसार रविवारी (ता. १५) रोजी झालेल्या कारवाईत एकूण २,१०३ विनापरवाना जाहिरात साहित्ये हटविण्यात आली. यामध्ये पोस्टर्स १,३२३, बॅनर्स व झेंडे २९३, भिंतीवरील लेखन २६२, ३६४ हॉर्डिंग यांचा समावेश आहे. या मोहिमेत सरकारी मालमत्तांवरील २७०, तर खासगी मालमत्तांवरील १,८१३ फलकबाजीचा समावेश आहे. या प्रकरणात एकूण ३६४ गुन्हे दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT