मुंबई

''करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया’ आदित्य ठाकरेंचे डोममधील मेळाव्यात शक्तिप्रदर्शन

CD

‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया’
आदित्य ठाकरेंचे डोममधील मेळाव्यात शक्तिप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज वरळीतील एनएससीआय डोममध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. ‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया’ या शीर्षकाखाली झालेल्या या मेळाव्यात युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांच्या घोषणांनी संपूर्ण डोम दणाणून गेला.
मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजप-शिंदे गटावर थेट टीका करत, ‘वोटचोर, नोटचोर आणि क्रेडिटचोर एकत्र आले की काय होतं, ते मुंबई आज भोगते आहे,’ असा घणाघात केला. मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. भ्रष्टाचारामुळे आज महापालिकेवर तब्बल अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज झाल्याचेही त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकाळातील कामगिरीचा आढावा घेताना कोविड काळातील जम्बो कोविड केअर सेंटरचा विशेष उल्लेख केला. ‘आज ज्या डोममध्ये आपण बसलो आहोत, इथूनच उद्धवसाहेबांच्या आदेशानंतर देशातील पहिले फिल्ड हॉस्पिटल उभे राहिले. जाहिराती न करता आम्ही काम केलं, जीव वाचवले,’ असे सांगत त्यांनी तेव्हाची छायाचित्रे दाखवली.
.............................
‘२०२२ मध्ये महापालिकेकडे ९२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. कर न वाढवता, काम न थांबवता पारदर्शक कारभार करत आम्ही ही तिजोरी उभी केली; पण सत्तांतरानंतर तीच तिजोरी साफ करण्यात आली,’ असा आरोप त्यांनी १९९७ ते २०२२ या काळातील महापालिकेची आर्थिक स्थिती ग्राफिक्सच्या माध्यमातून मांडताना केला.
.............................
‘पुढचे १५-२० दिवस महत्त्वाचे आहेत. साधारण महिनाभरात आपला विजय दिवस आहे,’ असे म्हणताच डोम टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून उठला. गेले २५ वर्षे मुंबईत केलेली कामगिरी घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन करत, ‘आपण जे केलंय ते अभिमानाने सांगायचे,’ असा संदेश आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
...................................
मुंबई ही मराठी माणसाचीच - उद्धव ठाकरे
वरळीतील पदाधिकारी मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचा स्पष्ट संदेश दिला. ‘मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ती कुणाच्या हातातून जाऊ देणार नाही,’ असा ठाम निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला. ‘सत्तेच्या जोरावर पोस्टरबाजी, जाहिरातबाजी करून मुंबई जिंकता येत नाही, तर मुंबईकरांचा विश्वास जिंकावा लागतो,’ असे त्यांनी सांगितले. ‘सत्ता येते-जाते; पण शिवसेनेची नाळ मुंबईशी कायम आहे,’ असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एकजुटीने काम करण्याचे आणि आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा मुंबई जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
...................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT