मुंबई

मानखुर्दमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट

CD

मानखुर्दमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट

मुंबई, ता. १६ : मानखुर्द परिसरातील जनता नगर येथील ३० फूट रोडवरील एका चाळीत मंगळवारी (ता. १६) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घराच्या छताचा काही भाग कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जनता नगर येथील एका चाळीतील घरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे घराच्या छताचा काही भाग खाली कोसळला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमी दोघांना उपचारासाठी लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, अदाणी एनर्जी तसेच पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणत आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, रात्री १० वाजता सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना बर्न वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. पृथ्वीपाल जसपाल (वय ४०) हे ३० टक्के, तर राजेश खिचड (वय २५) हे २५ टक्के भाजल्याने त्यांना इजा झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. या स्फोटाच्या कारणाचा तपास पोलिस आणि अग्निशमन दलाकडून सुरू आहे.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

प्रवीण तरडेंचा ‘थिएटर व्हिजिट’ पॅटर्न आता बॉलिवूडमध्ये हिट! बॉलिवूडने स्वीकारला ‘तरडे फॉर्म्युला’

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT