मुंबई

मुंबईत युती-आघाडीचा पेच कायम!

CD

मुंबईत युती-आघाडीचा पेच कायम!
पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची धाकधूक वाढली
महापालिका निवडणूक :
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारीसाठी इच्छुकांनी हालचाली वाढवल्या असल्या, तरी राजकीय वर्तुळात अद्याप युती व आघाडीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. प्रमुख राजकीय पक्षांकडून अधिकृत युतीची घोषणा न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, ‘तिकिटाची लॉटरी लागेल का?’ या प्रश्नाने अनेक जण अस्वस्थ झाले आहेत.
एकूणच, वरिष्ठ पातळीवर युती-आघाडीचे सूत्र ठरत नाही, तोपर्यंत मुंबईतील राजकीय धुकं कायम राहणार आहे; मात्र वेळ न दवडता इच्छुकांनी आपापल्या परीने प्रचाराची आघाडी उघडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

युती-आघाडीचे घोडे कुठे अडले?
राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर होणारी ही मुंबई महापालिकेची पहिलीच मोठी निवडणूक आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांत सध्या खलबते सुरू आहेत. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणता प्रभाग कोणाच्या वाट्याला जाणार, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अनेक प्रभागांत एकाच जागेसाठी मित्रपक्षांच्या दोन दावेदारांनी दावा ठोकल्याने पेच अधिकच वाढला आहे.

इच्छुक उमेदवार संभ्रमात
पक्षाकडून अद्याप हिरवा कंदील न मिळाल्याने अनेक इच्छुक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. प्रभाग रचना व आरक्षण स्पष्ट असले, तरी युती होणार की नाही यावरच आमचे राजकीय भवितव्य ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया एका इच्छुकाने दिली. युती झाल्यास संबंधित प्रभाग मित्रपक्षाकडे गेल्यावर वर्षानुवर्षांची मेहनत वाया जाण्याची भीती कार्यकर्त्यांना सतावत आहे.

सोशल मीडियावर प्रचाराचा धडाका
पक्षीय पातळीवर शांतता असली, तरी डिजिटल माध्यमांवर मात्र प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारीची खात्री नसतानाही अनेक इच्छुकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हॉट्सॲपवर प्रचाराचा धडाका लावला आहे. काहींनी वैयक्तिक ब्रँडिंग सुरू केले असून, जनसंपर्क कार्यालयांचे फोटो, केलेल्या कामांचा आढावा, तसेच सण-उत्सवांच्या व जयंतींच्या शुभेच्छांचे डिजिटल बॅनर सातत्याने शेअर केले जात आहेत. ‘भावी नगरसेवक’ असा उल्लेख टाळत ‘लोकसेवक’ म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.

इच्छुकांकडून फिल्डिंग
तिकीट मिळावे, यासाठी अनेक इच्छुकांनी पक्ष कार्यालये व बड्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. आपल्या पसंतीच्या नेत्याची मर्जी संपादन करण्यासाठी फिल्डिंग लावली जात असून, त्यामुळे पक्ष कार्यालयांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासोबतच शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून आपली उमेदवारी कशी योग्य आहे, हे पटवून देण्याची रस्सीखेच सध्या सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT