मुंबई

अवैधरीत्या उभ्या टेलरला धडकून दोघांचा मृत्यू

CD

अवैधरीत्या उभ्या टेलरला धडकून दोघांचा मृत्यू
विद्यार्थ्यांच्या दुचाकीचा अपघात

मुंबई, ता. १८ ः मालाड पश्चिमेकडील एव्हरशाईन नगर परिसरात बुधवारी (ता. १७) रात्री ११च्या सुमारास विचित्र अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. रिडज डिसोजा (वय १८), त्याची मैत्रीण केल्यन फर्नांडिस (१८) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. रस्त्याकडेला अवैधरीत्या उभ्या कंटेनर वाहून नेणाऱ्या ट्रेलरला रिडजची दुचाकी धडकून हा अपघात घडला.
याप्रकरणी बांगूरनगर पोलिस ठाण्यात ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री रिडज, केल्यन यांच्या दुचाकीने वळण घेतले आणि रस्त्याकडेला उभ्या ट्रेलरला धडकली. या मार्गावर ट्रेलरसारखी अवजड वाहन उभे करण्यास परवानगी नाही. अपघाताची माहिती प्राप्त होताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना तातडीने जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले; मात्र उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी ओळखपत्राआधारे दोघांची ओळख पटवली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

प्रवीण तरडेंचा ‘थिएटर व्हिजिट’ पॅटर्न आता बॉलिवूडमध्ये हिट! बॉलिवूडने स्वीकारला ‘तरडे फॉर्म्युला’

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT