सातारा प्रकरणातील आरोपींच्या कोठडीत वाढ
मुंबई, ता. २० : सातारा येथील सावरी गावात अमली पदार्थांचा कारखाना सुरू करणाऱ्या आरोपींच्या पोलिस कोठडीत दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी वाढ केली. गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने हा कारखाना उद्ध्वस्त केला होता. मुलुंड येथे दोन आरोपींना एमडी या अमली पदार्थांच्या साठ्यासह अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाला या कारखान्याचा सुगावा लागला हाेता. या दोन आरोपींना २२ डिसेंबर, तर कारखान्याशी थेट संबंध असलेल्या आरोपींना २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यात विशाल मोरेचा समावेश आहे.