मुंबई

ठाकरे बंधूंच्या युतीचे राज्यभरातून स्वागत

CD

ठाकरे बंधूंच्या युतीचे राज्यभरातून स्वागत
निवडणुकीचे चित्र बदलणार; कार्यकर्त्यांना विश्वास


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (ता. २४) युतीची घोषणा केली. या घोषणेनंतर या युतीचे मुंबईसह राज्यभरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात, वाजत-गाजत, पेढे वाटून स्वागत केले. या नव्या युतीने मुंबई महापालिकेतील निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या घडामोडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आज अखेर वरळी येथे एका हॉटेलमध्ये एकत्रित पत्रकार परिषद घेऊन दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली. या घोषणेने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या सैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. तब्बल १८ वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. या युतीच्या घोषणेनंतर मुंबईतील शिवसेना आणि मनसे शाखांमध्ये जल्लोष करण्यात आला. तसेच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. ठाकरे बंधूंनी बुधवारी दुपारी १२ वाजता एकत्रित पत्रकार परिषद घेतली. मात्र या वेळी दोघांचे पक्ष कोणत्या आणि किती जागा लढणार, याबाबत बोलण्याचे टाळण्यात आले. त्यापूर्वी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य यांच्यासह दादर येथील शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे राज ठाकरे यांच्या मातोश्रीने दोघा भावांचे औक्षण केले. त्यानंतर दोघा भावांनी एकाच गाडीने शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले. या वेळी स्मृतिस्थळावर शिवसेनेचे खासदार, आमदार तसेच मनसेचे पदाधिकारी आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

मराठी व्होट बॅँक एकवटणार!
ठाकरे बंधूंच्या युतीने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या नव्या राजकीय समीकरणामुळे महायुतीत अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. त्यातच हिंदीसक्तीच्या विरोधात मराठी व्होट बँक एकवटण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.
...
दोन्ही भावांची युती झाली ही आम्हा सर्व शिवसैनिकांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. एक नवे पर्व सुरू झाले आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आता बळ येईल आणि मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा नक्की फडकेल.
- महादेव देवळे, माजी महापौर, मुंबई

दोन्ही भावांची युती झाली याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. त्यांचा कौंटुबिक जिव्हाळा वाढला आहे. उद्या ते एका झेंड्याखाली येतील. आज महाराष्ट्र दिवाळी साजरी करीत आहे.
- तानाजी मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

Truck Eicher Accident : भरधाव ट्रकची आशरला पाठीमागून धडक; भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, ८ शेळ्या दगावल्या

फक्त ३३ किमी रुंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे कशी जातात?

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT