भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा!
राज ठाकरे : पक्षातील मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : ‘राजकीय वादापेक्षा आणि भांडणापेक्षा माझा महाराष्ट्र मोठा आहे, या एका विचाराने आम्ही एकत्र आलाे आहाेत,’ अशी भूमिका मांडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसे युतीची घाेषणा केली. या वेळी त्यांनी जाेरदार फटकेबाजी केली. ‘पक्षातली मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत. त्यामुळे कोण किती जागा लढवेल, हे आताच सांगणार नाही,’ अशी टीकाही त्यांनी नाव न घेता भाजपवर केली.
युतीची घोषणा करताना राज ठाकरे यांनी जुन्या मुलाखतीचा हवाला दिला. ते म्हणाले, ‘काही काळापूर्वी माझी एक मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीत मी स्पष्टपणे बोललो होतो की, वैयक्तिक हेवेदावे किंवा वादापेक्षा ‘महाराष्ट्र’ ही संकल्पना माझ्यासाठी मोठी आहे. मला असे वाटते की, माझ्या त्या एका वाक्यापासूनच शिवसेना आणि मनसे पुन्हा एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली.’
जागावाटपाच्या मुद्द्यावर राज ठाकरे म्हणाले, ‘आम्ही कोण किती जागा लढवणार हे आताच सांगणार नाही. कारण सध्या राज्यात लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यात आता राजकीय पक्षांमधील मुले (उमेदवार) पळवणाऱ्या आणखी दोन टोळ्यांची भर पडली आहे.’ उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना थेट दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आता जे काही बोलायचं आहे, ते जाहीर सभेतच बोलू,’ असे सांगत ज्यांचे मुंबई आणि महाराष्ट्रावर प्रेम आहे, त्या सर्व पत्रकार बांधवांनी आणि जनतेने आमच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
‘दानवांना उत्तरे द्यायची नसतात’
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला राज ठाकरेंनी मिश्कीलपणे खोडून काढले. उद्धव ठाकरे उत्तर देत असताना राज ठाकरेंनी माईक स्वतःकडे घेतला आणि हसत-हसत म्हणाले, ‘मला असं वाटतं की उत्तरे देवांना द्यावीत, दानवांना नाही!’ राज यांच्या या एका वाक्याने संपूर्ण सभागृह दणाणून गेले.
राज ठाकरे म्हणाले...
- बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना आणि मनसेची युती झाल्याचे मी आज जाहीर करतो.
- मुंबईवर कुणाचीही हुकूमत चालू देणार नाही. मुंबईचा महापौर ‘मराठीच’ होणार आणि तो आमच्या युतीचाच होणार, हे मी ठणकावून सांगतो.
- त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. ते काय बोलतात त्यावर माझे व्हिडिओ (टीका करण्यासाठी) तयार आहेत.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.