मुंबई

हॉटेल्स, उपाहारगृहांची सखोल तपासणी

CD

हॉटेल्स, उपाहारगृहांची सखोल तपासणी
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : नाताळ आणि नववर्षाचे आगमनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, उपाहारगृहे व खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ असणे आवश्यक आहे. यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांची सखोल तपासणी करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.


नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेलमधील स्वच्छतेला विशेष महत्त्व असून, यासंदर्भात हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करावे. तपासणीदरम्यान मुदतबाह्य कच्च्या मालाचा वापर, अन्नपदार्थांमध्ये खाद्य व अखाद्य रंगांचा वापर, तसेच स्वच्छतेच्या निकषांचे पालन होत आहे की नाही, याची काटेकोर तपासणी करावी. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर मोठी मोहीम हाती घेतली असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी या वेळी स्पष्ट केले. मंत्री झिरवाळ यांच्या संकल्पनेतून ‘स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ हा विशेष उपक्रम २६ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा सविस्तर अहवाल मंत्री कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार
उत्तम स्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा व राज्य स्तरावर उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार देण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावरील पुरस्कार २६ जानेवारी २०२६ रोजी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, तर राज्य स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या हॉटेल्सचा सन्मान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Mahayuti Meeting : कोल्हापूर महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापालिकेतील सभापतिपदे होणार निश्चित

Miraj Crypto Scam : पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर जोडी गजाआड! मिरजेत हाय-प्रोफाइल छापेमारी; इब्राहिम आणि जास्मिनच्या घरात नेमकं काय सापडलं?

Latest Marathi News Live Update : वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मोटारसायकलवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर कारवाई

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

SCROLL FOR NEXT