मुंबई

मुंबई विमानतळावर सोयी सुविधांचे तीनतेरा

CD

मुंबई विमानतळावर प्रवाशांची गैरसाेय  
तासभर प्रथमोचार पेटी मिळेना; नियोजनाअभावी गर्दी 
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता.  २४ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सेवांबाबत प्रवाशांना आलेल्या त्रासदायक अनुभवांमुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. एका प्रवाशाला तासभर प्रथमोचार पेटी मिळाली नाही, तर दुसऱ्या प्रवाशाने   नियोजनाच्या अभावामुळे गर्दी झाल्याचे सांगितले. अन्य एका कर्मचाऱ्याकडून मदत मिळत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. या कारभारामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यावर प्रवाशांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. यासंदर्भात विमानतळ टीम तपास करेल, असे मोघम उत्तर देण्यात आले.
 
प्रवासी निशिथ  पांड्या म्हणाले, की मुंबई विमानतळ टर्मिनल २ प्रवेशद्वारावरील व्यवस्था योग्य नसल्याचे दिसून आले. बुधवारी पहाटे ४.४० वाजता टर्मिनल २ मध्ये प्रवेश करण्यासाठी ३ आणि ४ नंबरच्या प्रवेशद्वारावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची प्रचंड रांग लागली होती आणि ती अत्यंत संथ गतीने पुढे सरकत होती. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. विमानतळ प्रशासनाच्या सावळागोंधळामुळे हे झाले आहे. ढिसाळ नियोजन आणि   योग्य मार्गदर्शनाचा अभाव यास कारणीभूत आहे.
    
मुंबई विमानतळ १वर बुधवारी अत्यंत वाईट अनुभव आला. मिनाज नावाच्या महिला कर्मचाऱ्याने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. कोणतेही काम केले नाही; पण जबरदस्तीने चांगला फीडबॅक देण्याची मागणी केली. तिने कोणतेही काम न केल्याने मी तिला नकार दिला, असे निशिथ  पांड्या याने सांगितले.
===
प्रथमाेपचार पेटीचा अभाव
माझ्या मुलीला लंडनला जायचे होते.  टॅक्सीमधून ट्रॉली काढताना हाताला दुखापत झाली; मात्र संपूर्ण आंतरराष्ट्रीय प्रस्थान विभागात प्रथमोचार पेटीसाठी तिने एक तास धावपळ, विचारपूस  करूनही कोणतीही सोय झाली नाही. शेवटी तिला औषधांच्या दुकानात जाऊन पट्टी खरेदी करावी लागली. आंतरराष्ट्रीय दर्जाचा मानला जाणारा मुंबई विमानतळ असूनही अशा प्रकारे मूलभूत वैद्यकीय मदतीचा अभाव हे गंभीर आहे, असे प्रवासी अभय कुमार यांनी सांगितले.
==

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economic Crisis: पाकिस्तान व फिलिपिन्समध्ये चार दिवसांचा आठवडा; दरवाढीमुळे आपत्कालीन उपाययोजना, इंधन वाचविण्याचा प्रयत्न!

Sarpanch Bribe Case : गरीब ग्रामस्थाची झोपडी दुरुस्त करण्यासाठी सरपंचाने 15 हजारांची मागितली लाच, 'असा' अडकला जाळ्यात!

Kalamb Municipal Council Tightens Rules Against Garbage Dumping: कळंबमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर; नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Iran Missile Attack: सततच्या हल्ल्यांमुळे तणाव कायम; इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले, शस्त्रसंधी नाहीच!

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगरमध्ये अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला, ८ ते १० जण जखमी

SCROLL FOR NEXT