मुंबई

सांताक्रूझमधील इमारतील आग

CD

सांताक्रूझमधील इमारतीला आग
अग्निशमनच्या तत्परतेने दुर्घटना टळली

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २८ : सांताक्रूझ (पूर्व) येथील कलिना परिसरात असलेल्या ‘एमजीन चेंबर्स’ या व्यावसायिक इमारतीला शनिवारी (ता. २७) मध्यरात्री भीषण आग लागली. इमारतीचा सहावा मजला आगीच्या विळख्यात सापडला होता; मात्र मुंबई अग्निशमन दलाने युद्धपातळीवर प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
सी.एस.टी. रोडवर भारत बँकेसमोर असलेल्या एमजीन चेंबर्स (तळमजला अधिक सहा मजले) या इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती पहाटे २.३७ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला मिळाली. ही आग सहाव्या मजल्यावरील एका बंद कार्यालयात लागली होती. काचेचे दर्शनी भाग असलेल्या या इमारतीत धुराचे लोट साचल्याने आग विझवण्यात सुरुवातीला अडचणी येत होत्या. कार्यालयात आग पसरली होती. यामध्ये इलेक्ट्रिक वायरिंग, कार्यालयातील फाइल्स, महत्त्वाचे रेकॉर्ड्स, लाकडी फर्निचर, संगणक, खुर्च्या, फॉल्स सीलिंग आणि खिडक्या खाक झाल्या आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाने ‘लेव्हल-१’ची आग घोषित केली होती. घटनास्थळी चार फायर इंजिन, तीन जम्बो टँकर, एक हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि श्वासोच्छ्वास संच व्हॅन रवाना करण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर पहाटे ४.१४ वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. इतर यंत्रणांनीही धाव घेऊन मदतकार्यात सहभाग घेतला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT